congress leader abhay patil criticizes prakash ambedkar
congress leader abhay patil criticizes prakash ambedkarSaam Digital

महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांची परस्परविरोधी भूमिका, अकाेल्यात भाजपला पूरक मदत : डाॅ. अभय पाटलांचा गंभीर आराेप

congress leader abhay patil criticizes prakash ambedkar : अकोल्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांचे परस्परविरोधी भूमिका दिसून आल्याचे डाॅ. अभय पाटील यांनी नमूद केले.

- अक्षय गवळी

अकाेला लाेकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी त्यांचे पराभवाचे खापर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर फाेडलं आहे. डाॅ. पाटील यांनी आंबेडकर यांच्यावर काही गंभीर आरोप देखील केले आहेत.

अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी दणदणीत विजय मिळविला. त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. अभय पाटील म्हणाले अकाेला लाेकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांची भूमिका भाजपाला पूरक होती. त्यातूनच त्यांनी निवडणुक कालावधीत अनेकदा आपल्यावर वैयक्तिक टीका आणि आरोप केले. त्यामुळे काॅंग्रेसची हक्काच्या जागेवर पराभव स्विकारावा लागला.

congress leader abhay patil criticizes prakash ambedkar
जयसिंहंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा हिशोबच बाहेर काढला, भाजपचे मानले आभार; रणजितसिंह मोहिते पाटलांना नेमका काय दिला सल्ला

या मतदारसंघात मतदारांनी सन 2019 च्या तुलनेत आंबेडकरांचा मताधिक्य घटवल्याचा टोला अभय पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला. दरम्यान आपल्या पराभवाचं आत्मचिंतन करून पुढची दिशा ठरवणार असल्याचा अभय पाटील यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

congress leader abhay patil criticizes prakash ambedkar
पृथ्वीराज चव्हाणांचा बालेकिल्ला ढासळला, उदयनराजेंच्या विजयाचा अतुल भोसलेंनी मताधिक्यातून दिलं दणदणीत उत्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com