Congress ने आपल्या अध्यक्षांना बाथरूममध्ये केलं होतं बंद, सोनिया गांधींचं नाव घेत PM मोदींची टीका

PM Modi News: उत्तर प्रदेशात जाहीर सभेत काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सीताराम केसरी यांचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.
Congress ने आपल्या अध्यक्षांना बाथरूममध्ये केलं होतं बंद, सोनिया गांधींचं नाव घेत PM मोदींनी केली टीका
PM Modi ANI
Published On

उत्तर प्रदेशात जाहीर सभेत काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सीताराम केसरी यांचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, ''काँग्रेसला आता संविधानाची आठवण झाली आहे. याच काँग्रेसने आणीबाणी लादून राज्यघटना संपवण्याचा प्रयत्न केला होता. या घराणेशाही पक्षालाच पक्षाची घटना मान्य नाही. सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष होते. एका संध्याकाळी मॅडम सोनियाच्या गटाने सीताराम केसरी यांना बाथरूममध्ये बंद केले. नंतर उचलून रस्त्यावर फेकले. यानंतर सोनिया गांधी यांना अध्यक्ष करण्यात आले.''

मोदींनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनाही टोला लगावला. यूपीमध्ये 79 जागा जिंकल्याच्या दाव्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''पूर्वी मी ऐकायचो की लोक दिवसा स्वप्न पाहतात, पण आता मला त्याचा अर्थ कळला. 4 जून रोजी जनता त्यांना झोपेतून उठवणार आहे. मग हे लोक ईव्हीएमला दोष देतील.'' पंतप्रधान मोदी बुधवारी उत्तर प्रदेश येथील बस्ती येथे जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी ते असं म्हणाले आहेत.

Congress ने आपल्या अध्यक्षांना बाथरूममध्ये केलं होतं बंद, सोनिया गांधींचं नाव घेत PM मोदींनी केली टीका
Mumbai Drunk and Drive Case: पुण्यातील अपघातानंतर मुंबईतील हिट अँड रन खटले आले चर्चेत, त्या कुटुंबीयांना न्याय कधी मिळणार?

ते म्हणाले की, देशात 5 टप्प्यांच्या निवडणुका पार पडल्या असून या 5 टप्प्यांच्या निवडणुकांमुळे देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार येत आहे, हे निश्चित आहे. यातच सपा आणि काँग्रेसला मिळणारं एकही मत काही उपयोग आहे का? तुमचं मत वाया जावं असं इथल्या कोणत्याही मतदाराला आवडणार नाही. तुमचे मत त्या व्यक्तीला गेले पाहिजे ज्याची तुम्हाला सरकार बनवायची आहे.

मोदी म्हणाले की, ''या भागातील जनतेने नेहमीच आमची आश्वासने, हेतू आणि शब्दांवर विश्वास ठेवला आहे. मी याआधीही येथे काहीच कमी पडू दिलं नाही, पुढेही काही कमी पडू देणार नाही.'

Congress ने आपल्या अध्यक्षांना बाथरूममध्ये केलं होतं बंद, सोनिया गांधींचं नाव घेत PM मोदींनी केली टीका
Kapil Patil News : केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर भिवंडी पोलिसांत गुन्हा; काय आहे प्रकरण?

ते पुढे म्हणले, ''22 जानेवारी 2024 हा दिवस प्रत्येकासाठी अविस्मरणीय आहे. 22 जानेवारी म्हटल्याबरोबर देश जय श्री रामचा जयघोष करू लागतो. भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. भारताचा दर्जा आणि आदर वाढला आहे. भारत जागतिक मंचावर बोलतो तेव्हा जग लक्षपूर्वक ऐकतो.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com