PM Modi: भाजपकडून निकालापूर्वीच विजयाची तयारी! गिरगावमध्ये १० हजार बुंदीचे लाडू, तर दिल्लीत PM मोदींचा रोड शोच्या तयारी

BJP Celebration Planing Before Lok Sabha Result: लोकसभा निवडणुकीचा निकाल काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्याअगोदरच भाजपने विजयाची तयारी केल्याचं समोर आलं आहे.
भाजपकडून निकालापूर्वीच विजयाची तयारी
PM ModiSaam Tv

लोकसभा निवडणुकीसंदर्भात सर्व एक्झिट पोलने भाजपला मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे भाजपने निकालापूर्वीच विजयाची तयारी केल्याचं पाहायला मिळत आहेत. विजयानंतर दिल्लीमध्ये लोककल्याण मार्ग ते भाजप मुख्यालयापर्यंत पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो होणार आहे. यामध्ये सुमारे २ ते ३ लाख लोक सहभागी होऊ शकतात, अशी माहिती मिळत आहे.

भाजपकडून विजयाची जय्यत तयारी सुरू (BJP Celebration Planing) आहे. गिरगावमध्ये दहा हजार बुंदीचे लाडू तयार करण्यास सुरूवात झाली आहे. माजी आमदार अतुल शाह यांच्या माध्यमातून गिरगावमध्ये बुंदीचे लाडू तयार केले जात आहेत. भाजपला लोकसभेत विजयाचा विश्वास आहे. त्यामुळे बुंदीचे लाडू तयार करण्यात येत आहेत. भाजप पुन्हा एकदा सत्तेत येणार असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांना आहे. एक्झिट पोलने देखील असाच अंदाज व्यक्त केला आहे.

दहा हजार लाडूंचं उद्या वाटप करण्यात येणार आहे. भाजपकडून राम मंदिराची प्रतिकृती देखील तयार करण्यात आली आहे. हीच प्रतिकृती उद्या भाजपच्या प्रदेश कार्यालयात पाहायला मिळणार आहे. फिर एक बार मोदी सरकार, असा मजकूर लिहिलेले बॉक्स देखील तयार करण्यात आले आहेत. विजयाआधीच भाजपकडून जल्लोष होताना पाहायला मिळत आहे. आता सगळ्या जनतेचं लक्ष निकालाकडे लागलेलं (Lok Sabha Election 2024 Result) आहे.

भाजपकडून निकालापूर्वीच विजयाची तयारी
Manmohan Singh on Modi: 'देश वाचवण्याची शेवटची संधी, मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली', डॉ. मनमोहन सिंह यांचा पत्रातून हल्लाबोल!

एक्झिट पोलच्या अंदाजानंतर भाजपचे (BJP) मनोबल उंचावले आहे. आम्ही यावेळी चारशे पार करू, असं भाजप नेते बोलत आहेत. ४ जूनचा निकाल भाजपच्या बाजूने लागणार असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे, त्यामुळे भाजपने निकालापूर्वीच विजयाच्या उत्सवाची तयारी केली आहे. एक्झिट पोलच्या निकालामध्ये देशात पुन्हा एकदा मोदी सरकारचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. मोदी (PM Modi) सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर भव्य रोड शो देखील होणार आहे.

भाजपकडून निकालापूर्वीच विजयाची तयारी
Narendra Modi : लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; PM मोदी पोस्ट करत म्हणाले, 'मला विश्वास आहे की...'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com