Beed News: पंकजा मुंडेंनी बॅनरवर पक्षाचा आणि मेटे साहेबांचा उल्लेख टाळावा; शिवसंग्रामने काढले पत्रक

Beed Loksabha News: महायुतीचा मित्रपक्ष असणाऱ्या शिवसंग्रामने आक्षेप घेतला असून शिवसंग्रामच्या नावासह दिवंगत विनायकराव मेटे यांचा फोटो न लावण्याबाबत पत्रक जारी केले आहे.
Pankaja Munde News
Pankaja Munde NewsSaam tv

बीड: ता. १३ एप्रिल २०२४

महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आपल्या बॅनरवर शिवसंग्राम आणि दिवंगत नेते विनायकराव मेटे यांचा फोटो मित्रपक्ष म्हणून वापरला आहे. मात्र यावर आता महायुतीचा मित्रपक्ष असणाऱ्या शिवसंग्रामने आक्षेप घेतला असून शिवसंग्रामच्या नावासह दिवंगत विनायकराव मेटे यांचा फोटो न लावण्याबाबत पत्रक जारी केले आहे.

राज्यात कुठेही महायुतीकडून शिवसंग्राम आणि विनायकराव मेटे यांच्या फोटोचा वापर किंवा उल्लेख केला गेला नाही. मात्र बीडमध्ये जाणीवपूर्वक पंकजा मुंडे यांच्याकडून खोडसाळपणे शिवसंग्रामच्या नावासह मेटे साहेबांच्या फोटोचा वापर केला जात आहे. बॅनरवर त्यांच्याकडून नाव आणि फोटो टाकला जात आहे. यामुळे याविषयी आमचा आक्षेप आहे, अशी भूमिका शिवसंग्राम ने घेतली आहे.

त्यामुळे बीड लोकसभेच्या भाजप उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शिवसंग्रामच्या नावाचा आणि मेटे साहेबांच्या फोटोचा बॅनरवरील उल्लेख टाळावा. अशा आशयाचे पत्रकच शिवसंग्राम पक्षाच्या वतीने काढण्यात आले आहे. तसेच हा मुद्दाम खोडसाळपणा केल्याचा आरोपही पंकजा मुंडेवर करण्यात आला आहे.

Pankaja Munde News
Sangli Crime News : सांगलीत २६ लाखाची चांदी जप्त, आष्टातील वाहन चालकाची चाैकशी सुरु

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांनी शिवसंग्राम आणि विनायकराव मेटे यांचा फोटो टाळला होता. मग आता या नावाचा आणि फोटोचा त्या का वापर करतायत ? हा केवळ खोडसाळपणा आहे. असा गंभीर आरोप करत पंकजा मुंडेंनी पक्षाचे नाव आणि फोटो टाळावा. असे यावेळी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण काशीद यांनी म्हटले आहे.

Pankaja Munde News
Maharashtra Rain: राज्यभरात अवकाळी पावसाचा तडाखा, फळबागांसह लाखो हेक्टर शेतीचं नुकसान; बळीराजा संकटात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com