- अक्षय बडवे / विनाेद जिरे
बीड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक (beed lok sabha constituency) लढवू इच्छिणारे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते बजरंग सोनवणे (bajrang sonawane) हे उद्या (बुधवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांची साथ साेडून ज्येष्ठ नेते शरद पवार गटात (sharad pawar) गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. साेनवणे हे शरद पवार गटात गेल्यास भाजप नेत्या पंकजा मुंडे गटाला (bjp leader pankaja munde) डाेकेदुखी ठरणार अशी चर्चा सुरु आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)
बजरंग सोनवणे यांनी भाजपा उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवावी असा आग्रह त्यांचे कार्यकर्त्यांनी बीड जिल्ह्यातील केजमधील बैठकीत केला. बजरंग बाप्पा तुम्ही निवडणूक लढवाच, असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त करुन तयारी सुरु केली आहे.
सन 2019 कालावधीमधील लाेकसभा निवडणुकीत बजरंग साेनवणे यांनी विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवली हाेती. साेनवणे हे सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार गटात म्हणजेच महायुतीत आहेत. बीडची जागा भाजपच्या पंकजा मुंडे यांच्याकडे गेल्याने साेनवणे यांनी शरद पवार गटातून निवडणुक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
बीड लोकसभा मतदारसंघाची चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उद्या पुण्यात बैठक बाेलावली आहे. यावेळी बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीत बजरंग सोनवणे यांनी प्रवेश केला तर अजित पवारांना मोठा धक्का बसू शकतो. तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या गटाची डाेकेदुखी वाढू शकते अशी चर्चा आहे.
सन 2019 च्या निवडणुकीचा असा हाेता निकाल
प्रीतम मुंडे - 6 लाख 78 हजार 175 मते.
बजरंग सोनवणे - 5 लाख 9 हजार 807 मते.
1 लाख 68 हजार 368 मताच्या फरकाने प्रीतम मुंडे विजयी झाल्या होत्या.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.