अमरावतीमध्ये (Amravati) आज लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) मतदान होत आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. अशातच अमरावतीमध्ये भाजप प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी (Shivray Kulkarni) यांच्या मुलीचा मोठ्या थाटामाटामध्ये विवाहसोहळा पार पडला. लग्न लागताच नवरा-नवरी थेट मतदान केंद्रावर पोहचले आणि मतदान करत त्यांनी मतदानाचा अधिकार बजावला. सध्या अमरावतीमध्ये या नवरा-नवरीची चर्चा होत आहे.
अमरावतीतील राजकीय वारस असलेले प्रतिष्ठित कुटुंब म्हणून कुळकर्णी घराण्याची ओळख आहे. नुकताच कुळकर्णी घरामध्ये थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांची मुलगी गार्गी शिवराय कुळकर्णी आणि चैतन्य प्रशांत धोंडरीकर यांचा शुभविवाह आज अमरावतीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. डोक्यावर अक्षता पडल्यानंर गार्गी आणि चैतन्य थेट मतदान केंद्रावर पोहचले.
लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होण्यासाठी गार्गी आणि चैतन्य यांनी आयुष्यातील सर्वात मोठा क्षण इन्जॉय करत लग्न लागल्यानंतर मतदान करण्याचा निर्णय घेतला. लग्न लागल्यानंतर नव दाम्पत्य थेट बडनेरा येथील मतदान केंद्रावर पोहचले. या मतदान केंद्रावर त्यांनी आपले कर्तव्य बजावत मतदान केले. त्यांचे मतदान करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, अकोल्यामध्ये देखील आज लोकसभेसाठी मतदान होत आहे. अकोल्याच्या अक्षय ढोरे या तरुणाने लग्न करण्यापूर्वी मतदनाचा हक्क बजावला. अक्षय लग्नस्थळी जाण्यापूर्वी आपल्या मित्रांसोबत शिवनी परिसरातील मतदान केंद्रावर पोहचला. त्याठिकाणी त्याने मतदान केले. अक्षयवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. फक्त अमरावती आणि अकोलाच नाही तर राज्यातील ज्या ठिकाणी आज मतदान होत आहे त्याठिकाणी नवरा-नवरी लग्नाला जाण्यापूर्वी मतदान करत असल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.