Wardha Lok Sabha 2024 Voting: वर्ध्यात दोन तासांपासून ईव्हीएम मशीन बंद, नागरिकांची मतदान केंद्राबाहेर गर्दी

Maharashtra Election 2024 Phase 2 Voting: EVM Machine Was Stopped For 2 Hours in Wardha | हिंगणघाटमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. हिंगणघाट तालुक्यातील चानकी (कोरडे) येथील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.
Wardha Election 2024 News: Evm Machine Stopped For Two Hours In Wardha's Polling Station
Wardha Election 2024 News: Evm Machine Stopped For Two Hours In Wardha's Polling StationSaam Tv

चेतन व्यास, वर्धा

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Eletion 2024) दुसऱ्या टप्यात वर्धा लोकसभा मतदारसंघसाठी (Wardha Loksabha Election) आज मतदान होत आहे. सकाळपासून नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर मोठी गर्दी केली आहे. अशामध्ये हिंगणघाटमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. हिंगणघाट तालुक्यातील चानकी (कोरडे) येथील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.

दुसरीकडे यवतमाळमध्ये देखील ईव्हीएम मशीन बंद पडल्याचा प्रकार समोर आला आहे. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील हुडी बुद्रुक येथील मतदान केंद्रावरील हा प्रकार आहे. गेल्या दीड तासांपासून ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. त्यामुळे मतदारांची गैरसोय झाली आहे. केवळ 328 मतदान झाल्यानंतर मशीन बंद पडले.

Wardha Election 2024 News: Evm Machine Stopped For Two Hours In Wardha's Polling Station
Surat lok sabha : सूरत लोकसभा मतदारसंघात पुन्हा ट्विस्ट; NOTAला उमेदवार माना, सुप्रीम कोर्टात याचिका

हिंगणघाट तालुक्यातील चानकी (कोरडे) या गावातील मतदान केंद्रावर तब्बल सव्वा दोन तास ईव्हीएम मशीन बंद पडले होते. चानकी मतदान केंद्रावर सकाळी 10 वाजता ईव्हीएम मशीन बंद पडले होते. आता सव्वा दोन तासांनंतर मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. चानकी (कोरडे) येथील बूथ क्रमांक 314 मधील हा प्रकार आहे. चानकी येथे 1178 मतदार आहेत. मशीन बंद होण्यापूर्वी फक्त 118 नागरिकांनी मतदान केले होते.

आता पुन्हा मतदान सुरु झाले असून मतदान केंद्रावर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. आज सकाळपासून वर्धा जिल्ह्यातील देवळी, कारंजा, वर्धा आणि हिंगणघाट या चार ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या होत्या. ईव्हीएम दुरूस्तीनंतर या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदारांना पुन्हा मतदान करण्यासाठी बोलावले जात आहे.

Wardha Election 2024 News: Evm Machine Stopped For Two Hours In Wardha's Polling Station
Akola News : प्रशासनाकडून घरे रिकामे करण्याची नोटीस; अकोल्यातील ७० कुटुंबीयांचा मतदानावर बहिष्कार

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यात वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात एकूण 1997 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. या मतदारसंघात यंदा 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. यात भाजपाचे रामदास तडस (ramdas tadas) आणि शरद पवार गटाचे अमर काळे (amar kale) यांच्यात जोरदार टक्कर होणार असल्याचे चित्र आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

Wardha Election 2024 News: Evm Machine Stopped For Two Hours In Wardha's Polling Station
Ajit Pawar : आचारसंहिता भंग झाला नाही! त्या वक्तव्यावर अजित पवारांना मोठा दिलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com