

कॅन्सर हे अनेक प्रकारचे असतात. यामध्ये अपेंडिक्सचा कॅन्सर देखील असतो. अपेंडिक्सचा कॅन्सर हा फार दुर्मिळ प्रकारचा कॅन्सर मानला जातो. जो मोठ्या आतड्याला जोडलेल्या अपेंडिक्स नावाच्या छोट्या पिशवीत तयार होतो. जठरांत्र संस्थेतील एकूण कॅन्सरपैकी एक टक्का पेक्षा कमी रुग्ण बाइल डक्ट कॅन्सरचे असतात.
मात्र संशोधनानुसार, या प्रकाराचा प्रसार हळूहळू वाढताना दिसतोयय. 40 वर्षांखालील व्यक्तींमध्ये या आजाराचं प्रमाण चिंताजनकरीत्या वाढताना दिसतंय. पूर्वी अपेंडिक्सचा कॅन्सर प्रामुख्याने वृद्धांमध्ये दिसून येत होता. मात्र आता बदललेल्या जीवनशैलीमुळे तरूणांमध्येही याचं प्रमाण दिसून येतंय.
अपेंडिक्सच्या कॅन्सरचं निदान होणं फार कठीण मानण्यात येतं. यामधील सर्वात मोठं आव्हान म्हणजे त्याची लक्षणं अत्यंत अस्पष्ट आणि सामान्य स्वरूपाची असतात. पोटदुखी, सूज, अपचन यांसारख्या लक्षणांमुळे रुग्णांमध्ये गोंधळ निर्माण होतो आणि निदान करणं कठीण होते. अनेक वेळा ही लक्षणे इतर जठराच्या समस्येसारखी असतात त्यामुळे अपेंडिक्सचा कॅन्सर ओळखण्यात उशीर होतो.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अपेंडिक्समधील पेशी ज्यावेळी अनियंत्रितपणे वाढू लागतात, तेव्हा अपेंडिक्सचा कॅन्सर होतो. या कॅन्सरचे विविध प्रकार आहेत. हे प्रकार कोणते आहे ते जाणून घेऊया.
न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर (NETs)- हा सर्वात सामान्य प्रकार असून तो शरीरात संथपणे वाढतो.
म्युसिनस अॅडेनोकार्सिनोमा- प्रकार म्युसिन नावाचे पदार्थ तयार करतो आणि पोटात जेलसारखा पदार्थ साचण्याची स्थिती निर्माण करतो.
गोब्लेट सेल कार्सिनोमा- हा कॅन्सरचा प्रकार अतिशय धोकादायक आणि दुर्मिळ मानला जातो.
सिग्नेट रिंग सेल कार्सिनोमा- हा फारच धोकादायक मानला जातो. महत्त्वाचं म्हणजे यावर उपचार करणं फार कठीण मानण्यात येतं.
या आजाराची सुरुवातीची लक्षणं बहुतेक वेळा दिसून येत नाहीत. जेव्हा लक्षणे दिसतात, तेव्हा ती अपेंडिसायटिस किंवा आयबीएससारख्या इतर समस्यांसारखी असतात. संभाव्य लक्षणांमध्ये पोटदुखी किंवा सूज, शौचाच्या सवयींमध्ये बदल, अनपेक्षित वजन घट, स्त्रियांमध्ये अंडाशयाच्या गाठी आणि अपेंडिसायटिससारखी लक्षणं जी सहज बरी होत नाहीत यांचा समावेश होतो.
अपेंडिक्सचा कॅन्सर हा बहुतेक वेळा इतर समस्यांचं निदान करताना दिसून येतो. उदाहरणार्थ, अपेंडिक्स काढण्याच्या शस्त्रक्रियेनंतर इतर समस्यांसाठी स्कॅन करताना किंवा तपासणीसाठी शस्त्रक्रिया करताना याचं निदान होतं.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.