थकवा दूर करणारं, एकाग्रता वाढवणारं आसन- विपरीत करणी

कामामुळे आलेला शारीरिक व मानसिक थकवा दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आसन म्हणजे विपरीत करणी.
विपरीत करणी आसन
विपरीत करणी आसनSaam Tv
Published On

कामामुळे आलेला शारीरिक व मानसिक थकवा दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आसन म्हणजे विपरीत करणी. शारीरिक, मानसिक, भावनिक थकवा दूर करण्यासोबतच या आसनाचे इतरही अनेक फायदे आहेत. तर जाणून घेऊयात, विपरीत आसन कसे करावे आणि त्याचे फायदे कोणते..

हे आसन कसे करावे?

जमिनीवर किंवा योग मॅटवर झोपून हळूहळू दोन्ही पाय वरच्या दिशेने सरळ करा. यावेळी तुमच्या शरीराचा आकार हा एल (L) प्रमाणे असावा. यावेळी तुमच्या दोन्ही हातांनी कमरेला आधार देण्याचा प्रयत्न करा. पाय आणि पायांची बोटं ही सरळ व ताठ राहतील याची काळजी घ्या. थकवा, स्ट्रेस, तणाव कमी करण्यासाठी हे आसन अत्यंत उपयोगी आहे.

विपरीत करणीचे फायदे कोणते?

- या आसनामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.

- स्त्रियांच्या शरीररचनेसाठी हे आसन अत्यंत फायदेशीर आहे.

- थकवा, ताण, चिंता दूर करण्यास मदत होते.

- पायांना आलेली सूज कमी होण्यास मदत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com