World Stroke Day: ब्रेन स्ट्रोक येण्यापूर्वी शरीर तुम्हाला देतं 'हे' संकेत; वेळीच लक्षणं ओळखून वाचवा जीव

World Stroke Day 29 October: दरवर्षी २९ ऑक्टोबर हा दिवस जगभरात जागतिक स्ट्रोक दिवस म्हणून मानजा जातो. स्ट्रोक हा जगभरात मृत्यू आणि कायमस्वरूपी अपंगत्वाचे एक प्रमुख कारण आहे. स्ट्रोक म्हणजे मेंदूला होणारा रक्तपुरवठा अचानक खंडित होणं ज्यामुळे काही मिनिटांतच मेंदूतील पेशी मृत पावू लागतात.
World Stroke Day 29 October
World Stroke Day 29 Octobersaam tv
Published On

मेंदूच्या काही भागात रक्तपुरवठा खंडित किंवा कमी झाल्यास स्ट्रोकची समस्या उद्भवते. यामुळे मेंदूच्या पेशी मृत पावतात. स्ट्रोक तेव्हा होतो जेव्हा मेंदूच्या रक्तवाहिन्या अरुंद होतात. ज्यामुळे रक्त प्रवाह कमी होतो (इस्केमिक स्ट्रोक) किंवा रक्तवाहिनी फुटुन हेमोरेजिक स्ट्रोक होतो. अशा परिस्थितीत वैद्यकीय उपचार करणं महत्वाचं आहे. कारण वेळीच उपचार रुग्णांच्या तब्येतीत चांगली सुधारणा करू शकतात.

नवी मुंबईतील न्यूईरा हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जन डॉ. सुनील कुट्टी म्हणाले की, स्ट्रोक हे देशभरात मृत्यू आणि दीर्घकालीन अपंगत्वाचे एक प्रमुख कारण ठरतोय. स्ट्रोकची कारणं म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या, रक्तवाहिनी फुटणं (हेमोरेजिक स्ट्रोक) आणि उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, लठ्ठपणा आणि हृदयरोग यासारखे इतर घटक, ज्यामुळे स्ट्रोकची शक्यता वाढते. सध्या, स्ट्रोक केवळ प्रौढांमध्येच नाही तर तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो.

World Stroke Day 29 October
Neck Pain : सावधान! तुमची उशी मानदुखीचे कारण तर नाही ना? तज्ज्ञांच्या संशोधनातून धक्कादायक सत्य समोर

स्ट्रोकमुळे उद्भवणारी गुंतागुंत

वेळेत उपचार न केल्यास स्ट्रोकमुळे गंभीर गुंतागुंत होऊ शकते जसे की-

  • शरीराच्या एका बाजूला अर्धांगवायू किंवा अशक्तपणा

  • अस्पष्ट बोलणे

  • गिळताना समस्या आणि जीव घाबरणे धोका

  • दृष्टीदोष किंवा अंधत्व

  • स्मृती कमी होणे, मूड स्विंग किंवा नैराश्य

  • स्ट्रोक व्यवस्थापनात प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. कोणताही विलंब न करता स्ट्रोकची लक्षणे ओळखणे आणि वेळीच उपचार करणे गरजेचे आहे .

स्ट्रोकची लक्षणं ओळखण्यासाठी ‘बीफास्ट’ (BEFAST) ह्या संज्ञेचा वापर करण्यात येतो. यामध्ये प्रत्येक अक्षर एक महत्त्वपूर्ण लक्षण दर्शवतं. प्रत्येक अक्षर कोणते संकेत दर्शवतात ते पाहूयात.

B – बॅलेंस

स्ट्रोक आलेल्या व्यक्तीचं अचानक संतुलन बिघडण्याचा धोका अधिक असतो. या रूग्णांना नीट उभं राहता येत नाही. एकंदरीत, रुग्णाला बॅलन्स करता येत नाही.

E – आईज (Eyes)

स्ट्रोकमध्ये रूग्णांच्या दृष्टीवर तात्काळ परिणाम होण्याचा धोका असतो. यावेळी एका किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये अचानक अंधुकपणा किंवा दृष्टी कमी होण्याचा त्रास होतो.

World Stroke Day 29 October
Neck Pain : सावधान! तुमची उशी मानदुखीचे कारण तर नाही ना? तज्ज्ञांच्या संशोधनातून धक्कादायक सत्य समोर

F – फेस (Face)

स्ट्रोकमधील एक मुख्य लक्षणांपैकी एक म्हणजे चेहरा. स्ट्रोक आल्यानंतर चेहऱ्याच्या एका बाजूला तिरकसपणा येतो. त्या व्यक्तीला हसण कठीण होतं किंवा चेहऱ्याचा काही भाग सुस्त होतो.

A – आर्म्स (Arms)

स्ट्रोकमुळे हाताची कार्यप्रणाली कमी होऊ लागते. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला हात उचलताना अडचण येऊ शकते. त्याचप्रमाणे हातात त्राण नसल्याप्रमाणे वाटू लागतं.

World Stroke Day 29 October
Heart arteries thickening signals: हृदयाच्या नसा जाड होऊ लागल्यास शरीर देतं 'हे' संकेत; हार्ट अटॅक येण्यापूर्वी धोका ओळखा

S – स्पीक (Speak)

स्ट्रोक आलेल्या व्यक्तीला बोलण्यामध्ये अडचणी जाणवू लागतात. यामध्ये पीडित व्यक्तीची जीभ अडखळू लागते. शब्द नीट उच्चारता येत नाहीत किंवा काहीवेळा ती व्यक्ती अजिबात बोलू शकत नाही.

World Stroke Day 29 October
Heart artery blockage signs: हार्ट वेन्स ब्लॉक झाल्यास शरीरात दिसतात 'हे' बदल; चुकूनही या रेड फ्लॅग्सकडे दुर्लक्ष करू नका

T – टाइम (Time)

कोणत्याही उपचारांसाठी वेळ हा खूप महत्त्वाचा घटक असतो. त्याचप्रमाणे स्ट्रोकसाठीही हा घटक महत्त्वाचा मानला जातो. स्ट्रोकची कोणतीही लक्षणं दिसल्यास त्वरित रुग्णाला जवळच्या रुग्णालयात नेणं अत्यंत गरजेचं असतं.

World Stroke Day 29 October
Heart blockage: मान किंवा जबड्यामध्ये वेदना होतायत? हृदयाच्या धमन्या ब्लॉक होण्यापूर्वी पाहा कोणते 5 संकेत मिळतात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com