

आयसीसी 'वर्ल्ड कप 2023' ला सुरुवात झाली आहे. हे सामने पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक असतात. सर्वांना हे सामने प्रत्यक्ष स्टेडियमवर जाऊन पाहणे शक्य होत नाही. त्यांना हे सामने डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सामने मोफत पाहता येणार आहे.
डिस्ने प्लस हॉटस्टार नेहमी युजर्ससाठी नवीन फिचर्स लाँच करतात. तर क्रिकेटप्रेमींना वर्ल्ड कप सामने अधिक चांगल्या पद्धतीने पाहता यावे यासाठी नवीन फिचर्स लाँच केले आहेत. डिस्ने प्लस हॉटस्टारने लाईव्ह आणि व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी फिचर्स अपडेट केले आहेत. व्हिडिओ आणि ऑडिओ क्वालिटी चांगली व्हावी हे यामागचे उद्दिष्ट आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारने एकूण ५ नवीन फिचर्स लाँच केले आहेत.
कंपनीने वर्ल्ड कप 2023 साठी नवीन Max View फिचर लाँच केले आहे. यामध्ये पोट्रेट मोड (Potrait Mode) म्हणजेच व्हर्टिकल व्ह्यूमध्ये तुम्ही सामने पाहू शकता. यामध्ये लाईव्ह फिल्ड, जाहिराती सर्वच व्हर्टिकल व्ह्यूमध्ये दिसणार आहे. त्यामुळे फोन उभा पकडून तुम्ही सहज सामना पाहू शकता.
डिस्ने प्लस हॉटस्टारने अॅपला अशा प्रकारे ऑप्टिमाइज केले आहे की त्याने व्हिडिओ पाहण्यासाठी कमी डेटा खर्च होतो. त्यामुळे युजर्स मोबाईल डेटाची बचत करु शकतात. तसेच व्हिडिओची क्लिअॅरिटी वाढवण्यासाठी AI चा वापर करण्यात येणार आहे.
आपण कामात असलो तरी आपले लक्ष नेहमी मॅचच्या स्कोअरवर असते. त्यामुळे डिस्ने प्लस हॉटस्टारने नवीन फिचर लाँच केले आहे. Always on Scorecard हे फिचर लाँच केले आहे. यात तुम्हाला फ्लोटिंग टॅबमध्ये स्क्रीनवर स्कोर दिसेल.
क्रिकेट म्हटल्यावर कॉमेंट्री तर येतेच. अनेकांना सामना पाहण्यापेक्षा कॉमेंट्री ऐकण्यात जास्त रस असतो. कामाच्या व्यापात कॉमेंट्री ऐकणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी लाईव्ह फिल्ड टॅब हे खास फिचर लाँच केले आहे. यात कॉमेंट्री वाचायला मिळणार आहे. स्पर्धकाचे स्टेटस आणि मॅचचे अपडेट्स ही सर्व माहिती या फिचरमुळे मिळणार आहे.
डिस्ने प्लस हॉटस्टारने कमिंग सून नावाचा टॅब सुरू केला आहे. यात मॅचसाठी रिमायंडर लावता येणार आहे. यामुळे तुम्हाला मॅचच्या वेळा आणि अपडेटचा रिमायंडर लावता येणार आहे. तसेच फ्री आणि पेड कंटेट वेगवेगळ्या विभागात दिसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.