World Asthma Day : काम करताना दम्याचा त्रास झाल्यास कशी घ्याल काळजी ? डॉक्टरांनी दिल्या टिप्स

Breathing Problem : अनेकदा एसीमध्ये बसल्यानंतर अस्थमा असणाऱ्यांना श्वास घेण्यात अनेक अडचणी येतात.
World Asthma Day
World Asthma Daysaam Tv

Asthma Symptoms : बदलेल्या जीवनशैलीमुळे व वाढते शहरीकरण, प्रदूषण यामुळे श्वसनविकारांचे प्रमाणही वाढत आहे. परंतु, काम करताना अनेकदा आपल्या श्वास घेताना त्रास होतो. अनेकदा एसीमध्ये बसल्यानंतर अस्थमा असणाऱ्यांना श्वास घेण्यात अनेक अडचणी येतात.

झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल्सचे पल्मोनोलॉजिस्ट डॉ. चेतन जैन यांनी दम्याचा विकार असलेल्यांनी काय काळजी घ्यावी याविषयी सांगितले आहे. ते सांगतात की, दमा हा विकार श्वसनमार्गाला नुकसान पोहोचवतो. ज्यामुळे श्वास घेताना अडचण निर्माण होतात.

World Asthma Day
World Asthma Day : दम्याचा त्रास टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

१५% ते ३३% प्रौढांमध्ये कामाशी संबंधित कारणांमुळे दम्याचा विकार झालेला असतो. कामाशी संबंधित दमा तेव्हा होतो जेव्हा आधीच अस्तित्वात असलेला दमा कामाच्या ठिकाणी रसायनांच्या संपर्कात आल्याने त्रास होतो.

ग्रीनपीस इंडियाच्या अहवालानुसार, भारतातील ९९ टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला हवेच्या संपर्कात येते. जागतिक आरोग्य (Health) संघटनेच्या पीएम २.५ साठी आरोग्य-आधारित मानकांपेक्षा जास्त आहे.

World Asthma Day
World Asthma Day : या 5 कारणांवरुन कळेल तुम्हाला आला आहे दम्याचा अटॅक...

1. लक्षणे

  • वारंवार खोकला

  • छाती भरून येणं

  • धाप लागणो

  • श्वास घेताना त्रास

  • दगड आणि कोळसा खाणीत काम करणाऱ्या माणसांपासून कापडगिरण्या, इलेक्ट्रिक रिपेअर, औषधउद्योग, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना या व्यावसायिक फुफ्फुसरोगांना सामोरे जावे लागू शकते.

  • सिलिकॉन, अॅस्बेस्टॉस, कापडाचे तंतू, आदी घटक सातत्याने श्वसनात आल्याने श्वसनसंस्थेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात.

  • सेंट्रलाइज्ड एसीमुळे अनेकदा श्वसनविकार मोठ्या प्रमाणात होतात. यात अनेकांना सर्दी होणे, शिंका येणे, खोकला येणे, डोके दुखणे आणि श्वसनविकाराशी (Breathing) झगडत असलेल्यांना दम्याचा वारंवार त्रास होतो.

2. अशी घ्याल काळजी

  • कामाच्या ठिकाणी ऍलर्जी आणि त्रासदायक घटकांचा संपर्क कमी करण्यासाठी, सुरक्षित आणि निरोगी कामाचे वातावरण तयार करणे हा सर्वोत्तम उपाय आहे.

  • कामाच्या ठिकाणी योग्य फेस मास्क, एअर फिल्टर आणि योग्य वेंटिलेशनचा वापर करा

  • दम्याचे लवकर निदान करण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी केल्यास कामाच्या ठिकाणी एक्सपोजर कमी केले जाऊ शकते.

World Asthma Day
Sayali Sanjeev Photoshoot : हिरवा शालू अन् हातात मोत्याच्या बांगड्या, सायलीच्या पैठणींवर साऱ्यांच्या नजरा
  • प्राणायाम, ध्यानधारणा, योगामुळे आणि मनशांतीच्या व्यायामामुळे दमा नियंत्रित होऊ शकतो.

  • श्वास रोखून धरण्याच्या पद्धती मानसिक तणावावर मात करतात.

  • दम्याचे लवकर निदान झाल्यास लवकर उपचार होऊ शकतात. त्यामुळे त्वरित डॉक्टरांना संपर्क साधणे आणि लवकरात लवकर उपचार करणे, योग्य ठरेल.

  • आपले वजन नियंत्रित ठेवणे, धूम्रपान, मद्यपान यापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com