World Mental Health Day : पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त डिप्रेशनमध्ये; मानसिक आजाराचं कारण काय? वाचा तज्ज्ञांचे उपाय

Depression In Women Over 40 : जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२३ च्या अहवालानुसार, पुरुषांपेक्षा महिलांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण जास्त असल्याचं दिसून आलं आहे. महिला अधिक प्रमाणात डिप्रेशनमध्ये असल्याची कारणं काय असू शकतात याबाबत तज्ज्ञांनी आपल्याला माहिती दिलीये.
Depression In Women Over 40
Depression In Women Over 40saam tv
Published On

आज १० ऑक्टोबर असून आजच्या दिवशी जागतिक आरोग्य दिवस मानला जातो. या दिवसाच्या निमित्ताने मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यात येते. अजूनही आपल्या समाजात मानसिक आरोग्याबाबत म्हणावी तशी जनजागृती झालेली नाही. मानसिक समस्यांना अजूनही फारसं गंभीरतेने घेतलं जातं नाही. २०२३ च्या अहवालानुसार, पुरुषांपेक्षा महिलांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण जास्त असल्याचं दिसून आलं आहे.

पुरुषांपेक्षा महिला अधिक डिप्रेशनमध्ये

आजही आपल्या देशात बहुतेक लोक शारीरिक समस्यांना आजार मानतात. मानसिक आरोग्याकडे फार क्वचितच लक्ष देण्यात येतं. मात्र मानसिक आरोग्याच्या वाढत्या प्रकरणांचा आकडा धक्कादायक आहे.

Depression In Women Over 40
Liver health: दहा पैकी तीन लोकांचं यकृत खराब; 'या' गोष्टी ठरतात कारणीभूत, तज्ज्ञांचा इशारा

डब्ल्यूएचओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या 2023 च्या अहवालानुसार, पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण अधिक आहे. यामध्ये 10 पैकी जवळपास 6 महिला डिप्रेशनने ग्रस्त असल्याचं समोर आलं आहे. असं असूनही महिलांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष दिलं जात नाही. महिला अधिक प्रमाणात डिप्रेशनमध्ये असल्याची कारणं काय असू शकतात.

महिलांमध्ये का जास्त आहे डिप्रेशनचं प्रमाण?

नांदेडच्या जोशी हॉस्पिटलमधील सल्लागार न्यूरोसायकियाट्रिस्ट डॉ. प्रणद जोशी यांनी महिलांमध्ये वाढलेल्या डिप्रेशनबाबत माहिती आहे. डॉ. प्रणद यांनी सांगितलं की, महिलांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण वाढतंय यामागे अनेक कारणं आहेत. यामधील एक कारण म्हणजे हार्मोन्सचा असमतोल. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सचा महिलांच्या मनावर, वागणुकीवर, शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर मोठा प्रभाव पडतो. याचा परिणाम मानसिक आरोग्यावर देखील होऊ शकतो.

हार्मोन्सचं असंतुलन, अधिक जबाबदाऱ्या तसंच अपुरी झोप या कारणांमुळे महिलांमध्ये डिप्रेशन वाढण्याचा धोका असतो. महिलांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे.
डॉ. प्रणद जोशी, न्यूरोसायकियाट्रिस्ट

अतिरीक्त जबाबदाऱ्यामुळेही वाढतंय महिलांमधील डिप्रेशन

महिला म्हटलं की, घराच्या जबाबदाऱ्या या आल्याच. जर ती वर्किंग वुमन असेल तरीही त्या महिलेला घराची जबाबदारी सांभाळून नोकरी करावी लागते. डॉ. प्रणद पुढे म्हणतात की, महिलांवर असलेल्या अतिरीक्त जबाबदाऱ्यामुळे नैराश्य येण्याचा धोका असतो. 40 ते 55 वयोगटातील महिलांमधील रजोनिवृत्तीच्या कारणाचा देखील डिप्रेशनशी संबंध असतो. याशिवाय अपुरी झोप, स्वतःला वेळ न देणं, ब्रेक न घेणं या सर्व कारणांमुळे महिलांमध्ये डिप्रेशनचं प्रमाणा वाढतंय.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, हे डिप्रेशनची गंभीरता प्रत्येक महिलेनुसार वेगळी असू शकते. काही महिलांमध्ये याचं प्रमाण तीव्र असू शकतं. तर काही महिलांमध्ये ते सौम्य असण्याची शक्यता आहे.

Depression In Women Over 40
Back Pain: सणासुदीच्या दिवसात पाठदुखीचा त्रास होतोय? काय घ्याल काळजी, तज्ज्ञांचं म्हणणं एकदा जाणून घ्याच!

महिलांनी कोणते उपाय केले पाहिजेत?

  • पुरेशी झोप घेणं

  • योग्य प्रमाणात आराम करणं

  • योगा

  • मेडिटेशन

  • छंद जोपासा

  • योग्य आहार घेणं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com