Back Pain: सणासुदीच्या दिवसात पाठदुखीचा त्रास होतोय? काय घ्याल काळजी, तज्ज्ञांचं म्हणणं एकदा जाणून घ्याच!

Back Pain: गेल्या दोन महिन्यांपासून सणासुदीचे दिवस सुरु आहेत. लोक सणासुदीच्या काळात आनंद साजरा करताना त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. या काळात पाठीच्या दुखण्याचा त्रास कसा टाळायचा ते पाहूयात.
back pain festival
back pain festivalsaam tv
Published On

सध्या देशभरात नवरात्रीचा उत्साह साजरा केला जातोय. गणपतीनंतर लगेच नवरात्रीची धामधूम पाहायला मिळतेय. तर आता नवरात्रीनंतर सर्व जण दिवाळीच्या तयारीला सुरुवात करतील. गेल्या दोन महिन्यांपासून सणासुदीचे दिवस सुरु आहेत. या दिवसांमध्ये आपण धावपळ करतो. यावेळी सामानाची ने-आण करणं, जड वस्तू उचलणं किंवा तासनतास उभं राहणं या कृतींमुळे पाठीच्या समस्या उद्भवण्याचा धोका वाढतो.

लोक सणासुदीच्या काळात आनंद साजरा करताना त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यावेळी जड वस्तू उचलणं, दीर्घकाळ एका जागी बसून राहणं, स्वयंपाक करताना तासनतास उभं राहणं अशा चुका नकळत घडतात. या क्रियांमुळे पाठदुखीचा त्रास उद्भवू लागतो. ही तीव्र पाठदुखी तुमची मानसिक शांतताही हिरावते. सणासुदीच्या दिवसात हा त्रास कसा टाळायचा ते पाहूयात.

back pain festival
Side Effects Of Sugar: अतिप्रमाणात साखरेचं सेवन केल्यास शरीर देतं हे सिग्नल; वेळीच लक्षणं ओळखा

सणासुदीच्या दिवसात का होते पाठदुखी?

नवी मुंबईतील ऑर्थोपेडीक सर्जन डॉ. अभय छल्लानी यांनी माहिती दिली की, सजावटीचे जड बॉक्स उचलण्यापासून ते स्वयंपाक करण्यासाठी सतत उभं राहणं त्याचप्रमाणे तुमच्या मित्रांना भेटवस्तू तयार करणं अशा अनेक गोष्टींचा पाठीवर परिणाम होतो आणि अस्वस्थता निर्माण होते. उत्साहाच्या भरात शारीरिक स्थितीकडे दुर्लक्ष केलं जातं आणि पाठीवर ताण येतो. तीव्र पाठदुखीमुळे तुम्ही सणासुदीच्या नीट एन्जॉय करू शकत नाही. ज्यामुळे तुमची रोजची कामं सहजतेने करणं तुम्हाला आव्हानात्मक वाटू शकतं. सर्व सणांच्या दरम्यान लोकांना त्यांच्या आरोग्याची विशेषत: पाठीची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून त्यांना सणांचा आनंद लूटता येतो आणि तणावमुक्त राहता येतं

सणासुदीच्या काळात पाठदुखी टाळण्यासाठी खास टिप्स

  • सणासुदीचा काळ म्हणजे तुमचं संपूर्ण घर सजवण्यासाठी तासनतास खर्च करावे लागतात. यामुळे थकवा येऊ शकतो जो तुमच्या पाठीवर जास्त दबाव निर्माण करतो. जिना चढताना किंवा डेकोरेशन बॉक्स उचलताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.

  • आवश्यक असेल तेव्हा शिडी किंवा स्टूलचा वापर करा. शिवाय यावेळी काही बसून काम करताना पोक काढून बसू नका. केवळ ताठ बसा.

  • निरोगी राहण्यासाठी शारीरिक हालचाली किंवा व्यायाम करणं ही एक चांगली सवय आहे. यामुळे तुम्हाला पाठदुखी किंवा दुखापती टाळता येऊ शकतो.

  • चालणं, पोहणं, सायकलिंग, कार्डिओ, वजन उचलणं आणि जिमला जाणं यांसारख्या गोष्टी तुम्ही करू शकता.

  • मऊ उशी असलेल्या खुर्च्यांचा वापर करा ज्या तुमच्या पाठीला दीर्घकाळासाठी आधार मिळू शकतो.

  • तुमचे पाय जमिनीवर सपाट असल्याची खात्री करा.

  • सणासुदीच्या काळात फॅशनवर अधिक भर दिला जातो आणि यावेळी उंच हिल्सच्या चपला वापरल्या जातात. जे तुमच्या पायाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतं आणि मणक्याला देखील हानी पोहोचवतं.

डॉ अभय छल्लानी पुढे सांगतात की, उंच टाचांच्या चपला किंवा पेन्सिल हिलमुळे तुमच्या पाठीवर जास्त ताण पडतो. अशावेळी आरामदायी चपलांची निवड करा. तुम्ही प्रवास करत असाल तर योग्य स्थितीत बसणं आणि अधून मधून स्ट्रेचिंग करणं फायदेशीर ठरेल. या काळात तुम्ही दर 3 ते 4 तासांनी ब्रेक घ्या.

back pain festival
Liver health: दहा पैकी तीन लोकांचं यकृत खराब; 'या' गोष्टी ठरतात कारणीभूत, तज्ज्ञांचा इशारा

मीरा रोडच्या वोक्हार्ट रूग्णालयातील ऑर्थोपेडीक सर्जन डॉ. गिरीश भालेराव यांनी माहिती की, सणासुदीच्या काळात नाचणं, जड वस्तू उचलणं आणि घरातील कामांमध्ये बिझी राहणं यांसारख्या क्रियांमुळे पाठदुखीच्या समस्या उद्भवतात. यामुळे तुमच्या पाठीवर परिणाम होतो त्याचप्रमाणे स्नायूंवर ताण, हर्निएटेड डिस्क्स आणि सायटिका यासारख्या गुंतागुंत होऊ शकतात. उत्सवादरम्यान तुमच्या पाठीची काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं. कोणत्याही दुखापती किंवा किरकोळ ताण, सूज कमी करण्यासाठी ताबडतोब कोल्ड कॉम्प्रेशन वापरा. वेदना दीर्घकाळ राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com