Winter Care Tips : हिवाळ्यात सर्दीमुळे त्रस्त आहात? या आयुर्वेदिक ड्रिंक्सचा समावेश करा, लगेच मिळेल आराम

Healthy In Winters : हिवाळ्यात वातावरणातील बदलामुळे आपल्या अनेक संसर्गजन्य आजारांना सामोरे जावे लागते. या काळात सर्दी-खोकला आणि ताप यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.
Winter Care Tips
Winter Care Tips Saam Tv
Published On

Ayurvedic Drinks :

हिवाळ्यात वातावरणातील बदलामुळे आपल्या अनेक संसर्गजन्य आजारांना सामोरे जावे लागते. या काळात सर्दी-खोकला आणि ताप यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.

अशा वेळी काही औषधी गुणधर्मांनी युक्त असणाऱ्या पेयांचा आहारात समावेश करा. यामध्ये तुम्ही हळद, लिंबू, तुळस, मध आणि दुधापासून (Milk) बनवलेले ड्रायफुट्स इत्यादीपासून बनवलेले पेय आपल्याला आतून मजबूत आणि उबदार बनवतील. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत होईल.या ऋतूमध्ये होणार्‍या सर्दी, फ्लू, खोकलाआणि ऍलर्जी यांच्याशी लढण्यास देखील मदत करू शकतो. त्यासाठी आहारात (Food) या आयुर्वेदिक ड्रिंक्सचा समावेश करा.

1. मसाला चहा

मसाला चहा हा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लवंग, वेलची, आले, काळी मिरी पावडर, तमालपत्र इत्यादी मसाल्यांचा चहा प्या. हा आरोग्यासाठीही खजिना मानला जातो. यामध्ये असणारे औषधी (Medicine) गुणधर्म आहेत ज्यामुळे तुमची चयापचय मजबूत राहाते.

Winter Care Tips
Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचा ड्राय का पडते? Soft Skin साठी या टिप्स फॉलो करा

2. लिंबूपाणी

हिवाळ्यात, कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पिऊन सकाळची सुरुवात करा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. हिवाळा हा विविध प्रकारच्या व्हायरल इन्फेक्शनचा हंगाम असतो. स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी दररोज याचे सेवन करणे खूप महत्वाचे आहे.

3. आले गिलॉय मिक्स काढा

आले, गूळ, काळी मिरी, तुळशीची पाने आणि गिलोय यांचे मिश्रण करून बनवलेला काढा आपल्याला सर्दीपासून वाचवतोच पण रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचे काम करतो. तसेच स्नायू आणि सांधेदुखी देखील कमी करते.

Winter Care Tips
तरुणांनो हृदय जपा! या चुकांमुळे येऊ शकतो Heart Attack, लक्षणे दिसल्यास वेळीच व्हा सावध

4. कॉफी

कॉफीमध्ये असणारे कॅफिन श्वसनाच्या समस्या आणि सर्दी, फ्लूपासून बचाव करण्यास मदत करते. वजन कमी करण्यास हृदय निरोगी ठेवण्यास आणि शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com