Buddha Purnima 2025: बुद्ध पौर्णिमा का साजरी केली जाते? जाणून घ्या रंजक इतिहास

Buddha Jayanti : १२ मे २०२५ रोजी येणारी बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मातील पवित्र आणि प्रेरणादायी दिवस आहे. जाणून घ्या गौतम बुद्धांचा जन्म, बोधीप्राप्ती, महापरिनिर्वाण, चार आर्यसत्य आणि बुद्धांच्या विचारांच्या आधारे आयुष्यात कशी प्रेरणा घ्यावी.
Buddha Purnima 2025
Buddha Jayantigoogle
Published On

बुद्ध पौर्णिमा यंदा १२ मे २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे. बुद्ध पौर्णिमेलाच वैशाख पौर्णिमा असेही म्हणतात. हा दिवस बौद्ध धम्मात खूप महत्वाचा मानला जातो. हा दिवस साजरा करण्यामागची ती विशेष कारणे आहेत. पहिले म्हणजे याच दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. याच दिवशी ज्ञान प्राप्ती झाली आणि याच दिवशी बुद्धांचं महानिर्वाण झाले होते.

Buddha Purnima 2025
Badlapur Tourism: अवकाळी पाऊस अन् बदलापूरचा निसर्ग, One Day Trip ठरेल सगळ्यात हटके ठिकाण

बुद्ध पौर्णिमा कशी साजरी केली जाते? (How is Buddha Purnima celebrated?)

मुळात अहिंसा, करुणा आणि समता या तत्त्वांवर बौद्ध धर्म आधारित आहे. बुद्ध पौर्णिमेला बौद्ध भिक्षू बुद्ध विहारात एकत्र येऊन प्रार्थना घेतात. बुद्धांच्या मुर्तीसमोर मेणबत्ती दीप लावतात. फुलं वाहतात. शिवाय बुद्ध विहाराचा परिसर विविध रंगांच्या पताकांनी सजवला जातो. तसेच बौद्ध भिक्षू समाजाला बुद्धांना मिळालेले ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवतात. गौतम बुद्धांना बोधगया येथे ध्यान करत असताना त्यांना बोधीवृक्षाखाली(पिंपळाच्या झाडाखाली) आत्मज्ञान प्राप्त झाले. त्याबद्दल सांगितले जाते.

पुर्वी समाजात माजलेलं अवडंबर, पशूबळी, नरबळींसह वैदिक कर्मकांडाचा विरोध केला जात असे. तसेच मानव कल्याणाचा उपदेश केला जायचा. या बद्दल माहिती देत असत. बौद्ध ग्रंथांचे वाचन, धम्मचक्र प्रवर्तन, ध्यानधारणा,करुणा, दया आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याचा संकल्प याबद्दल सविस्तर माहिती भिक्षू देतात. शेवटी प्रसाद म्हणून खीर दिली जाते.

बुद्धांनी सांगितलेली चार आर्यसत्य कोणती? (What are the four noble truths taught by Buddha?)

1. जीवनात दु:ख असणार.

2. दु:खाला कारण असते.

3. दु: खाचे निवारण करता येते.

4. दु: ख कमी करण्याचे उपाय असतात.

बुद्ध पौर्णिमा कोणत्या देशात साजरी केली जाते?(In which country is Buddha Purnima celebrated?)

बुद्ध पौर्णिमा फक्त भारतातच नाही तर जग भरात साजरा केली जाते. यात श्रीलंका, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन, नेपाळ, मलेशिया, म्यानमार, इंडोनेशिया आणि पाकिस्तानात सुद्धा साजरी केली जाते. या पौर्णिमेला विविध देशांनुसार त्यांच्या भाषाशैलीनुसार नावे आहेत. उदा. श्रीलंका या देशात बुद्ध पौर्णिमेला ' वेसाक' असं म्हणतात. हा वैशाखचा अपभ्रंश आहे.

गौतम बुद्ध कोण होते? (Who was Gautama Buddha?)

इ.स.पू. ५व्या-६व्या शतकात जन्मलेले, एक राजपुत्र ते पुढे समाजसुधारक आणि धर्मगुरू बनले. त्यांनी जीवनातील दुःख, त्याची कारणं आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी ऐहिक जीवन सोडले.

EDITED BY: SAKSHI JADHAV

Buddha Purnima 2025
Potato Chivda Recipe: घरच्या घरी गरमा गरम चहा अन् बटाट्याचा कुरकुरीत चिवडा, लगेचच नोट करा रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com