Saam Tv
मस्त पावसाळ्यात विकेंड घालवण्यासाठी पुढील भन्नाट रेसिपी घरच्या घरीच ट्राय करू शकता.
बटाटा, कडीपत्ता, शेंगदाणे, तेल, मीठ, पिठीसाखर, काजू, मनुका, बदाम
सगळ्यात आधी बटाटा स्वच्छ धुवून घ्या. मग त्याला किसनीच्या गोल आकारपातून किसून घ्या.
किसून घेतलेल्या जाड बटाट्यांचे सुरीने पुन्हा काप करून घ्या.
आता एका पातेल्यात पाणी गरम करा आणि त्यात बटाट्याचे काप धुवून घ्या.
धुतलेले काप व्यवस्थित सुकवा आणि वाळवत ठेवा. याला फक्त ५ मिनिटे लागतील.
आता कढई गरम करा. त्यात तेल तापवून बटाटे तळा आणि परातीत काढा.
अशाच प्रकारे कढीपत्ता, शेंगदाणे, बदाम, काजू, मनुके परतून घ्या.
आता सगळे साहित्य , मीठ आणि पिठीसाखर एकत्र करा. तयार आहे तुमचा स्पेशल कुरकुरीत चिवडा.