Saam Tv
आयुर्वेदात तुळशीच्या पानांना भरपूर फायदेशीर मानले जाते. याचा वापर कधी आणि कसा करावा हे आपण पुढे जाणून घेणार आहोत.
तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने तोंडातील जंतू मरतात आणि तोंड स्वच्छ करतात. त्यानेच हिरड्या मजबूत होतात.
उठल्या उठल्या तुम्ही तुळशीची पाने चावून घात असाल तर पोटातील विषारी द्रव्य (toxins)बाहेर पडतात.
सर्दी, खोकला, दमा अशा सामान्य आजारांवर तुळस हा एक प्रभावी आहे.
तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
रिकाम्या पोटी तुळशी खाल्ल्यास पचनसंस्था उत्तेजित होते आणि अॅसिडिटीसारख्या त्रासावर फायदा होतो.
तुळशीचे सेवन मानसिक तणाव, चिंता कमी करतं आणि मेंदूला शांती देण्याचे कार्य करते.
तुळशी नियमित घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी व कोलेस्टेरॉल बॅलन्समध्ये राहतो.
NEXT: मोहिनी एकादशीच्या संध्याकाळी करा 'हे' उपाय, टिकेल हाती आलेला पैसा