Saam Tv
आज म्हणजेच वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात.
यंदा मोहिनी एकादशी 8 मे 2025 रोजी साजरी केली जाणार आहे.
मोहिनी एकादशीला विष्णूसोबत रामाची पूजा केली जाते.
तुम्हाला जर पैशाच्या खूप अडचणी येत असतील किंवा हातातील पैसा टिकत नसेल तर या दिवशी केलेला उपाय तुमचे भाग्य बदलेल.
विष्णू देवाला तुळस प्रिय असल्याने तुम्ही संध्याकाळी तुळशीच्या रोपासमोर तूपाचा दिवा लावावा.
विष्णू सहस्त्रनाम आणि कनकधारा स्तोत्र संध्याकाळच्या पुजेवेळी करा.
आज नैवेद्य तयार करताना तांदळाचा वापर करू नका.
तुम्ही नैवेद्यासाठी विष्णू भगवानाची आवडती मखाण्यांची खीर करू शकता.