Saam Tv
काही सण असेल असेल तर आपण काहीतरी गोड पदार्थ बनवतो.
पुढे तुमच्यासाठी अशीच एक भन्नाट आणि साउथ इंडियन स्टाईल गोड अप्पे बनवण्याची कृती सोप्या स्टेप्सने सांगणार आहोत.
रवा, गूळ, केळी, किसलेले खोबरे, वेलची पावडर, मीठ, सोडा, दूध आणि तेल.
सर्वप्रथम केळी मॅश करा. मग त्यात गूळ, खोबरं, वेलची पूड आणि चिमूटभर मीठ घाला.
आता रवा भाजून घ्या. आणि तो तुमच्या केळीच्या साहित्यात मिक्स करा.
या मिश्रणात तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट मिश्रण करा.
आता अप्प्यांचे पात्र गरम करा आणि त्याला तेल लावून घ्या.
आता त्या भांड्यात पीठ ओतून घ्या आणि व्यवस्थित अप्पे भाजून घ्या.
अप्पे व्यवस्थित भाजल्यावर व्यवस्थित गरमा गरम सर्व्ह करा.