Hotel Room Booking: हॉटेलमध्ये रुम बुक करताय? नेहमी तिसऱ्या आणि सहाव्या मजल्यावरच बुक करा, जाणून घ्या कारण

Why Choose Third or Sixth Floor Hotel Room : परदेशात किंवा जवळच्या ठिकाणी तुम्ही देखील राहाण्यासाठी हॉटेल बुक करत असाल तर ही बातमी जरुर वाचा.
Hotel Room Booking
Hotel Room BookingSaam Tv
Published On

Safest Room Booking :

लाँग विकेंड आला किंवा कामानिमित्त आपल्यापैकी अनेक जण बाहेर फिरायला जातात. परदेशात किंवा जवळच्या ठिकाणी तुम्ही देखील राहाण्यासाठी हॉटेल बुक करत असाल तर ही बातमी जरुर वाचा.

कमी खर्चात आणि स्वस्तात मस्त म्हणून आपण चांगल्या हॉटेलसाठी गुगल सर्च करतो. OYO, Make My Trip किंवा यांसारख्या कमी दरात सोय होणाऱ्या हॉटेल्सची निवड करतो. परंतु, जर आम्ही तुम्हाला सांगितले की, हॉटेल निवडताना तुमची रुम ही तिसऱ्या किंवा सहाव्या मजल्यावर असायला हवी. तुम्हाला प्रश्न पडला असे तर जाणून घ्या त्यामागचे कारणं. याबाबत माजी CIA आणि FBI एजंटने याबाबत काही टिप्स दिल्या आहेत जाणून घेऊया त्याबद्दल

Hotel Room Booking
Soaked Walnuts Benefits : चिमुकल्यांना महिनाभर खाऊ घाला 3-4 भिजवलेले अक्रोड, बुद्धी होईल तल्लख

1. तिसऱ्या आणि सहाव्या मजल्यावर रुम निवडण्याचे कारण काय?

ट्रेसी वॉल्डर नावाच्या एका माजी एजंटने सांगितले की, जेव्हा हॉटेलमध्ये (Hotel) तुम्ही रुम (Room) बुक (Book) करण्याचा विचार करता तेव्हा नेहमी ते तिसऱ्या किंवा सहाव्या मजल्यावर असायला हवी. यामागचे कारण आहे सुरक्षा. त्यांनी सांगितले की, वरच्या मजल्यावर असणाऱ्या खोल्या या मेन मजल्याच्या जवळ असतात किंवा आपत्कालीन वेळी लगेच निघण्यास मदत होते. तसेच येथे चोरीचा धोका देखील कमी असतो.

2. या गोष्टी लक्षात ठेवा

वेल्डर सांगतात की, याशिवाय आपण ज्या हॉटेलमध्ये राहाणार आहोत त्याबद्दल आधी माहिती करुन घ्या. मुलांच्या जवळ ट्रॅकिंग उपकरणे असायला हवे. सामानावर AirTag असायला हवा. यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.

Hotel Room Booking
Cloves Benefits : रात्री झोपण्यापूर्वी खा फक्त २ लवंग, आरोग्याला होतील जबरदस्त फायदे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com