Summer Skin Care : उन्हाळ्यात चेहरा लाल का पडतो ? घराबाहेर पडण्याआधी या सोप्या टिप्स फॉलो करा

Skin Care : अचानक त्वचेवर इतके कडक ऊन लागल्यास त्वचेतील पेशींना धोका निर्माण होतो.
Summer Skin Care
Summer Skin CareSaam Tv

Home remedies For red skin : वाढत्या उन्हामुळे आपल्या त्वचेसंबंधित होणाऱ्या अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. आपली त्वचा ही अधिक संवेदनशील असल्यामुळे आपण उन्हातून बाहेर निघालो की, ती लालसर होते किंवा रॅशेस पडतात.

अचानक त्वचेवर (Skin) इतके कडक ऊन लागल्यास त्वचेतील पेशींना धोका निर्माण होतो. या ऋतूमध्ये अधिक सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटेमुळे त्वचेशी संबंधित समस्या उद्भवतात.काही लोक इतके संवेदनशील असतात की, उन्हामुळे चेहऱ्यावर लालसरपणा येण्याची समस्या उद्भवते.

Summer Skin Care
Summer Skin Damage : उन्हाळ्यात त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी या 4 चुका कधीही करू नका

हे दूर करण्यासाठी लवकरात लवकर घरगुती उपायांचा (Home Remedies) अवलंब करावा.असे केल्याने चेहऱ्यावरील लालसरपणा दूर होऊ शकतो आणि जळजळ होण्यापासूनही आराम मिळू शकतो. लालसरपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय.

चेहऱ्यावरील लालसरपणा दूर करण्यासाठी या टिप्स फॉलो करा

1. मध-

मधाला आयुर्वेदात (Ayurved) सौंदर्यासाठी कारक मानला जातो. म्हणून त्वचेच्या अनेक गोष्टींवर मध हे फायदेशीर ठरते. यात असणारे दाहक-विरोधी गुणधर्म त्वचेची लालसरपणा आणि सूज दूर करण्यात मदत करतात. त्वचेवर पुरळ आणि खाज येण्याची समस्या दूर करण्यासाठी देखील हे खूप फायदेशीर आहे. जर तुमच्या चेहऱ्यावर लालसरपणाची समस्या देखील असेल तर मध जळजळणाऱ्या भागांवर लावा. 15 ते 20 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. अशाप्रकारे, दिवसातून दोन ते तीन वेळा केल्याने या समस्येपासून लवकर आराम मिळू शकतो.

Summer Skin Care
Weight And Height Calculate : वयानुसार किती असायला हवे आपले वजन?

2. गुलाब पाणी (Water)-

गुलाबपाणी त्वचेला थंडावा देऊ शकते. जर तुमच्या चेहऱ्यावर लालसरपणा दिसत असेल तर तुम्ही गुलाबपाणी त्यावर लावू शकता किंवा काकडीचा रस गुलाब पाण्यात मिसळून चेहऱ्यावर लावू शकता. 15 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. असे नियमित केल्याने काही दिवसातच लालसरपणा निघून जाईल.

3. कोरफड-

कोरफड हे गुणांनी परिपूर्ण आहे. यात बरे करण्याचे गुणधर्म आहेत, जे चेहऱ्यावरील लालसरपणाची समस्या दूर करण्यास मदत करते. तुमच्या चेहऱ्यावर लालसरपणा असेल तर संपूर्ण चेहऱ्यावर एलोवेरा जेल लावा आणि अर्ध्या तासानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. असे दिवसातून किमान २ ते ३ वेळा केल्यास आराम मिळेल.

Summer Skin Care
Skin Care After Mosquito Bites : डास चावल्यानंतर त्वचेवर रॅशेस आले आहेत ? या 5 घरगुती उपायांचा अवलंब करा

4. बर्फ-

लालसरपणा दूर करण्यासाठी बर्फ हा रामबाण उपाय आहे. बर्फ लावल्याने सूज आणि लालसरपणा कमी होण्यास मदत होते. यासाठी एका मऊ सुती कपड्यात बर्फाचा तुकडा टाकून त्या भागावर लावा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवू शकता, यामुळे देखील आपल्याला लवकर आराम मिळेल.

5. नारळ तेल-

नारळाच्या तेलामध्ये अँटीफंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेची ऍलर्जी आणि लालसरपणा दूर होण्यास मदत होते. जर तुमच्या चेहऱ्यावर लालसरपणा येत असेल तर बाधित भागावर खोबरेल तेल लावा. अर्ध्या तासानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ करा. दिवसातून तीन ते चार वेळा असे केल्याने लालसरपणा लवकर कमी होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com