Weird dreams during fever: ताप आल्यावर भयानक स्वप्नं का पडतात? जाणून घ्या यामागील सायन्स

Fever nightmares science: जेव्हा आपल्याला ताप येतो, तेव्हा शरीराला खूप अस्वस्थ वाटते आणि झोपही नीट लागत नाही. पण अनेकांना ताप असताना रात्रीच्या वेळी अत्यंत भयानक आणि त्रासदायक स्वप्ने पडण्याचा अनुभव येतो.
Fever nightmares science
Fever nightmares scienceSAAM TV
Published On
  • तापात विचित्र, भावनिक स्वप्नं पडू शकतात

  • मेंदू गरम झाल्यावर विचारशक्ती बदलते

  • REM झोपेत असंतुलन अधिक तीव्र होतो

वातावरण बदललं किंवा व्हायरल आला की आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं. आजारपण हे केवळ शरीरासाठीच नव्हे तर मनासाठीही थकवणारं असतं. सर्दी, खोकला, अंगदुखी आणि ताप यामुळे रोजचं आयुष्यच विस्कळीत होतं. पण या सगळ्याच्या मध्ये एक गोष्ट अशी असतं जी फारसं बोलली जात नाही ती म्हणजे तापात झोपताना येणारी विचित्र स्वप्नं, ज्यांना इंग्रजीत फीवर ड्रीम्स म्हणतात.

Fever nightmares science
Is waking up at 3 am normal: दररोज पहाटे ३-५ या वेळेत जाग येतेय? सावध व्हा आणि पाहा शरीर तुम्हाला काय संकेत देतंय?

फीवर ड्रीम्स म्हणजे काय?

तापाच्या वेळी झोपताना काही लोकांना अत्यंत भावनिक, विचित्र आणि कधी-कधी भितीदायक स्वप्नं पडतात. ही स्वप्नं इतकी खरी वाटतात की झोपेतून उठल्यावर बेचैनी आणि गोंधळ वाटू लागतो. यामागचं कारण शरीरात होणाऱ्या तापमानवाढीमुळे मेंदूच्या क्रियेमध्ये होणारा बदल आहे. तापामुळे मेंदू अधिक एक्टिव्ह होतो.

Fever nightmares science
Is waking up at 3 am normal: दररोज पहाटे ३-५ या वेळेत जाग येतेय? सावध व्हा आणि पाहा शरीर तुम्हाला काय संकेत देतंय?

एका अभ्यासानुसार, ९४ टक्के लोकांनी फीवर ड्रीम्स नकारात्मक आणि अस्वस्थ करणारी असल्याचं सांगितलं आहे. याचा अर्थ असा की, तापाच्या वेळी मेंदू हा भावना आणि आठवणी वेगळ्या पद्धतीने प्रक्रिया करतो, ज्यामुळे स्वप्नं अधिक विचित्र आणि भावनिक होतात.

ही स्वप्नं इतकी विचित्र का वाटतात?

ताप आल्यावर शरीराचं तापमान नियंत्रित करणं कठीण होतं. याला ओव्हरहीटेड ब्रेन थिअरी म्हणतात. जेव्हा मेंदू गरम होतो, तेव्हा त्याची विचार करण्याची क्षमता कमी होते. REM स्लीपमध्ये शरीर आधीच असंतुलित असतं आणि ताप हे असंतुलन वाढवतो. त्यामुळे काही लोकांना हलणाऱ्या भिंती, अंधार पसरताना, मोठे कीटक किंवा विचित्र जीव दिसतात हे सगळं फीवर ड्रीम्सचं सामान्य लक्षण मानलं जातं.

Fever nightmares science
Diabetes Control Drink: रिकाम्या पोटी प्या हे 3 Morning Drinks, काही तासात होईल Blood Sugar कंट्रोल

काय करावं?

फीवर ड्रीम्स पूर्णपणे टाळता येत नाहीत पण काही उपायांनी त्यांची तीव्रता कमी करता येते

  • पुरेसं पाणी पिणं आणि पोषणयुक्त आहार घ्या

  • झोपण्याचं वातावरण शांत आणि आरामदायक ठेवा

  • डॉक्टरांच्या सल्ल्याने ताप कमी करणाऱ्या औषधांचा वापर करा

  • झोपण्याआधी गर्भ श्वास, ध्यान किंवा हलकी स्ट्रेचिंग करा

Fever nightmares science
8AM Diabetes Symptoms: सकाळी उठल्यावर ब्लड शुगर का वाढलेली असते? 5 गोष्टी ठरतात कारणीभूत
Q

फीवर ड्रीम्स म्हणजे नेमकं काय असतं?

A

तापात झोपताना पडणारी विचित्र स्वप्नं असतात.

Q

फीवर ड्रीम्स का अधिक भावनिक वाटतात?

A

तापामुळे मेंदू भावना वेगळ्या प्रकारे प्रक्रिया करतो.

Q

ओव्हरहीटेड ब्रेन थिअरी म्हणजे काय?

A

मेंदू गरम झाल्यावर विचारशक्ती कमी होते.

Q

फीवर ड्रीम्स टाळण्यासाठी काय करावं?

A

शांत झोप, पाणी, योग्य आहार आवश्यक आहे.

Q

तापात स्वप्नं अधिक विचित्र का वाटतात?

A

झोपेतील असंतुलन स्वप्नं अधिक तीव्र करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com