

शरीराचं जैविक घड्याळ झोप नियंत्रित करतं
पहाटे कोर्टिसोल हार्मोन वाढू लागतो
तणावामुळे झोपेचा टप्पा खंडित होतो
अनेकदा रात्री झोपल्यानंतर आपल्याला सतत मध्ये-मध्ये जाग येत राहते. कधी अलार्म वाजण्याआधीच जाग येते. यावेळी ना कसला आवाज, ना हालचाल फक्त मनात एक विचित्र बेचैनी जाणवते. जर तुम्हाला रोज पहाटेच जाग येत असेल आणि त्यामागचं कारण समजत नसेल तर हे तुमचं शरीर तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतंय. हे संकेत नेमके काय असतात ते पाहूयात.
रात्री ३:४७ वाजता अचानक जाग येणं तुम्हाला योगायोग वाटू शकतो, पण हे अनेकदा शरीराच्या एका ठराविक चक्रामुळे होतं. आपल्या शरीरात एक २४ तास चालणारं सुसंगत जैविक घड्याळ असतं. ज्याला सर्कॅडियन रिदम म्हणतात.
हे चक्र हार्मोनच्या स्त्रावापासून शरीराच्या तापमानापर्यंत सगळं नियंत्रित करतं. पहाटे २ ते ५ वाजण्याच्या दरम्यान हे चक्र अत्यंत संवेदनशील अवस्थेत असतं. याच वेळी कोर्टिसोल नावाचा हार्मोन हळूहळू वाढायला लागतो. जेणेकरून तुम्हाला सूर्योदयाच्या आसपास नैसर्गिकरित्या जाग येऊ शकते. पण जर तुमच्यावर तणाव जास्त असेल, तर हे हार्मोन तुम्हाला हळूवारपणे उठवण्याऐवजी अचानक झोपेतून बाहेर खेचतो आणि हीच ती बेचैनी असते, जी तुम्हाला वेळेआधी जागं करते.
सततचा तणाव केवळ मूडच बिघडवत नाही तर झोपेची रचनाही बदलतो. झोपेचे विविध टप्पे व्यवस्थित पार न पडता शरीर हाय अलर्टवर राहतं. परिणामी झोप शांत आणि दीर्घ न लागता अर्धवट होते. विशेषतः REM झोपेच्या टप्प्यात मेंदू सर्वाधिक एक्टिव्ह असतो. याच वेळी आठवणी, भावना आणि अपूर्ण विचार प्रक्रिया होतात. त्यामुळे तणावग्रस्त लोक REM टप्प्यातूनच जागे होतात आणि त्यांना तो क्षण स्पष्ट आठवत राहतो.
जर तुम्ही रोज ३ ते ५ वाजेच्या दरम्यान उठत असाल तर हे तुमच्या क्रोनोटाइपचं संकेत असू शकतात. म्हणजेच तुमची नैसर्गिक झोप-जागरणाची वेळ असते. काही लोक सूर्योदयासोबत उठतात, तर काही रात्री उशिरा जागे राहून अधिक कार्यक्षम असतात. आजची ९ ते ५ जीवनशैली या बायोलॉजीकल क्लॉकशी अनेकदा विसंगत असते, ज्याला सोशल जेटलॅग म्हणतात. विशेषतः नाइट आउल्ससाठी सकाळी जबरदस्तीने उठणं हे तणाव आणि असंतुलन निर्माण करू शकतं.
चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही पूर्णपणे असहाय नाही. जर तुम्हाला रोज पहाटेच जाग येत असेल, तर खालील गोष्टी अमलात आणा:
तुमच्या झोपेचा नमुना डायरी किंवा अॅपमध्ये नोंदवा
रात्री स्क्रीन टाइम कमी करा, जेणेकरून बॉडी क्लॉक गोंधळून जाऊ नये
झोपण्याआधी कॅफेन आणि मद्यपान टाळा.
तणाव दिवसभरच नियंत्रित ठेवा
शक्य असेल तर तुमच्या क्रोनोटाइपनुसार दिनचर्या ठरवा
रोज पहाटे जाग येण्याचं कारण काय असू शकतं?
कोर्टिसोल हार्मोन वाढल्यामुळे शरीर जागं होतं.
तणाव झोपेवर कसा परिणाम करतो?
तणाव झोपेचे टप्पे खंडित करतो.
क्रोनोटाइप म्हणजे नेमकं काय असतं?
नैसर्गिक झोप-जागरणाची वेळ म्हणजे क्रोनोटाइप.
सोशल जेटलॅग म्हणजे काय?
जीवनशैली आणि बॉडी क्लॉकमधील विसंगती असते.
झोप सुधारण्यासाठी कोणते उपाय करावेत?
स्क्रीन टाइम कमी करा, तणाव नियंत्रित ठेवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.