National Farmer's Day 2023 : 23 डिसेंबरलाच शेतकरी दिवस का साजरा केला जातो? महत्त्व आणि इतिहास जाणून घ्या

National Farmer's Day : भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावण्यासाठी शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. २३ डिसेंबर म्हणजे आज दरवर्षी राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो.
National Farmer's Day 2023
National Farmer's Day 2023 Saam Tv
Published On

Why Celebrate National Farmers Day :

भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावण्यासाठी शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. २३ डिसेंबर म्हणजे आज दरवर्षी राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो.

२३ डिसेंबर हा दिवस भारताचे (India) पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह याचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. भारत हा मुख्यत: खेड्यांचा देश आहे आणि खेड्यांमध्ये राहाणारी बहुसंख्य लोकसंख्या शेतकरी आहे.

1. शेतकरी दिवस का साजरा केला जातो?

चौधरी चरण सिंह यांचा जन्म २३ डिसेंबर १९०२ रोजी उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील नूरपूर गावात एका मध्यमवर्गीय शेतकरी (Farmer) कुटुंबात झाला होता. पंतप्रधान असताना त्यांनी शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. तसेच शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी अनेक कायदे आणि धोरणे बनवली होती. २००१ मध्ये भारत सरकारने माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या सन्मानार्थ २३ डिसेंबर हा राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून घोषित करण्यात आला.

National Farmer's Day 2023
Corona Variant JN.1 : कोरोनाची चौथी लाट येणार?, पुढचे २-३ आठवडे महत्वाचे; तज्ज्ञांचे मत काय?

2. राष्ट्रीय शेतकरी दिनाचे महत्त्व

शेतकरी दिन प्रामुख्याने भारतातील उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि मध्य प्रदेश या कृषीप्रधान राज्यांमध्ये साजरा (Celebrate) केला जातो. या दिवशी देशातील अनेक राज्यांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले जाते.

तसेच अमेरिका, व्हिएतनाम आणि पाकिस्तान सारख्या देशांमध्येही शेतकरी दिवस साजरा केला जातो. या देशांमध्ये शेतकरी दिन हा वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com