International Yoga Day 2023 : योग दिवस का साजरा केला जातो ? जाणून घ्या इतिहास व थीम

International Yoga Day Theme : योगाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी जगभरात कार्यक्रम आयोजित केले जातात.
International Yoga Day 2023
International Yoga Day 2023Saam tv
Published On

International Yoga Day History : आंतरराष्ट्रीय योग दिन हा दिवस दरवर्षी २१ जूनला साजरा केला जातो. यंदा जगभरात ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करणार आहे. योगाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी जगभरात कार्यक्रम आयोजित केले जातात.

यादिवशी योग (Yoga) करण्याचे फायदे व त्याचे आरोग्यासाठी असणारे महत्त्व देखील सांगितले जाते. आयुर्वेदात योग ला अधिक महत्त्व आहे. योग ही अनेक शतकांपासून भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. ऋषीमुनी प्राचीन काळापासून योग करत आले आहेत. भारतातील (India) योगाचे महत्त्व पाहून त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारले गेले आहे.

International Yoga Day 2023
Yoga for white hair : पांढऱ्या केसांना पुन्हा काळे करायचे आहे ? 'ही' योगासने नियमित करा

1. आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी सुरू झाला?

27 सप्टेंबर 2014 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day) साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. ज्या अंतर्गत वर्षातील कोणताही एक दिवस योग दिन म्हणून साजरा करण्याची मागणी करण्यात आली होती.

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने हा प्रस्ताव मान्य केला. त्यानंतर दरवर्षी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो.

International Yoga Day 2023
Yoga For Abs : 6 पॅक हवे आहेत ? मग 'ही' योगासने नियमित करुन पाहा, 2 आठवड्यात मिळेल रिजल्ट !

या वर्षी 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. या वेळी आंतरराष्ट्रीय योग दिन वसुधैव कुटुंबकम या तत्त्वावर वन वर्ल्ड, वन हेल्थ अशी थीम ठेवण्यात आली आहे. ही थीम आयुष मंत्रालयाने निवडली आहे.

2. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश लोकांमध्ये योगाबद्दल जागरुकता निर्माण करणे हा आहे. या दिवशी लोकांना योगाबद्दल जागरूक केले जाते, त्याचे फायदे सांगितले जातात. जेणेकरून लोक दररोज योगाभ्यास करण्यासाठी वेळ काढू शकतील. योगासने केल्याने शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहते. नियमित योगा केल्याने अनेक आजार दूर राहतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com