Why men are taller than women: पुरुषांची उंची महिलांपेक्षा नेहमीच का जास्त असते? अखेर नव्या संशोधनातून सापडलं उत्तर

New research human height: सर्वसाधारणपणे असं दिसून येतं की, पुरुष महिलांपेक्षा उंचीने जास्त असतात. हा फरक केवळ आहार किंवा पर्यावरणावर अवलंबून नसून, यामागे काही ठोस जैविक कारणं आहेत. अलीकडील संशोधनांनी या दीर्घकाळापासून असलेल्या प्रश्नाचे नवीन उत्तर शोधले आहे.
Why men are taller than women
Why men are taller than womensaam tv
Published On

अनेकजण त्यांच्या उंचीबाबत अस्वस्थ असतात. अनेकदा यावरून तुलना होतानाही दिसते. उंचीवरून काही जणांची खिल्ली देखील उडवली जाते. बहुतेक वेळा आपण बघतो की, पुरुषांची उंची स्त्रियांपेक्षा जास्त असते. पण तुम्ही कधी विचार केलाय का असं का होतं? ही नुसती योगायोगाची गोष्ट आहे की यामागे खरोखर काही शास्त्रीय कारण आहे?

अमेरिकेतील गीसिंगर कॉलेज ऑफ हेल्थ सायन्सेस पेनसिल्वेनियामध्ये यासंदर्भात एक संशोधन करण्यात आलं. या संशोधनाच्या माध्यमातून या उंचीतील फरकाचं वैज्ञानिक कारण समोर आलं आहे. विशेषतः SHOX (Short Stature Homeobox) नावाच्या एका विशिष्ट जीनबद्दल यामध्ये माहिती देण्यात आली आहे. हे जीन पुरुष आणि महिलांच्या उंचीतला फरक ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं.

Why men are taller than women
Inflamed heart symptoms: हृदयाला सूज आल्यावर शरीरात दिसतात हे मोठे बदल; लक्षणं दिसताच डॉक्टरांकडे धाव घ्या

पुरुषांची हाईट वाढवणारं जीन

या संशोधनात 1225 लोकांच्या आरोग्यविषयक डेटाचं विश्लेषण करण्यात आलं. यात असं लक्षात आलं की SHOX नावाचा जीन, जो Y क्रोमोसोमवर अधिक एक्टिव्ह असतो. तो पुरुषांना सरासरी ३ सेंटीमीटरने अधिक उंच करतो. कारण Y क्रोमोसोम फक्त पुरुषांमध्येच असतो. महिलांमध्ये तो नसल्यामुळे, त्यांच्या शरीरावर SHOX चा फारसा प्रभाव पडत नाही. म्हणूनच स्त्रियांची उंची तुलनात्मकदृष्ट्या पुरुषांपेक्षा कमी असते.

SHOX जीनचा किती फरक पडतो?

शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, पुरुष आणि स्त्रियांच्या उंचीमधील सरासरी फरक १२ ते १४ सेंटीमीटर असतो. या पैकी सुमारे २२.६% फरक फक्त SHOX जीनमुळे निर्माण होतो. जर आपण दुसरी कारणं पाहिली तर हार्मोनचे बदल, आहार, आईवडिलांची उंची, आणि जीवनशैलीसारखे पर्यावरणीय घटक यांचाही फरक पडतो. याशिवाय पोषण, झोपेचा दर्जा, व्यायाम, किंवा अगदी जिथे आपण राहतो ती हवामानाची स्थिती यांचा देखील परिणाम होतो.

Why men are taller than women
Bone cancer symptoms : हाडांचा कॅन्सर झाल्यावर शरीरात होतात ४ मोठे बदल; दुर्लक्ष करणं पडेल महागात

उंची वाढणं शक्य आहे का?

संशोधकांचं म्हणणं आहे की, SHOX जीनवर अधिक संशोधन केल्याने भविष्यात उंची वाढवण्याचे उपाय किंवा उपचार विकसित करता येऊ शकतात. केवळ उंचीच नाही, तर या जीनच्या अभ्यासामुळे अल्झायमरसारख्या काही न्यूरोलॉजिकल आजारांचं कारण आणि संभाव्य उपचार देखील समजून घेता येतील.

Why men are taller than women
Blocked heart vessels symptoms: प्लाकमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद झाल्यावर शरीरात होतात मोठे बदल; कधी करावी लागू शकते एंजियोप्लास्टी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com