Hypertension Disease : WHO च्या अहवालातून धक्कादायक खुलासा! भारतातील ३७% तरुणांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका, कशी घ्याल काळजी

High Blood Pressure Issue : देशाच्या लोकसंख्येपैकी ३१% किंवा १८८.३ दशलक्ष लोक उच्च रक्तदाबाच्या आजाराने ग्रस्त आहेत.
Hypertension Disease
Hypertension DiseaseSaam Tv
Published On

WHO Hypertension Report Reveals :

सध्या ब्लड प्रेशर आणि डायबिटीजचे रुग्ण भारतात अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. नुकत्याच WHO चा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. त्यात भारतात २०४० पर्यंत किमान ४.६ दशलक्ष मृत्यू ब्लड प्रेशरमुळे टाळता येतील असे म्हटले गेले आहे.

देशाच्या लोकसंख्येपैकी ३१% किंवा १८८.३ दशलक्ष लोक उच्च रक्तदाबाच्या आजाराने ग्रस्त आहेत. उच्च रक्तदाबामुळे माणसाच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. उच्च रक्तदाबामुळे स्ट्रोक, हृदयविकाराचा धोका, मूत्रपिंडाचे नुकसान अशा अनेक समस्या उद्भवतात. पर्यायी त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो.

Hypertension Disease
Sprouted Chana Benefits : महिनाभर खा मोड आलेले चणे, शरीराला मिळतील जबरदस्त फायदे

WHO च्या अहवालानुसार, एकूण 37% भारतीय लोक बल्ड प्रेशरच्या आजाराने ग्रस्त आहेत. तर यावर केवळ ३०% लोक उपचार घेतात. देशातील उच्च रक्तदाब असलेल्या लोकांपैकी केवळ १५ टक्के लोकांचा हा आजार नियंत्रणात आहे. हृदयविकाराच्या झटका किंवा रक्तवाहिन्यांशी संबंधित आजांरामुळे निम्म्याहून (५२%)अधिक मृत्यू होऊ शकतात. असे अहवालात म्हटले आहे.

इतर देशांच्या तुलनेत भारतीयांमध्ये हृदयविकाराचा धोका असण्याची शक्यता जास्त आहे. त्यात तरुण लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण आहे. असे WHO च्या निष्कर्षात दिसून आले आहेत. अनियंत्रित रक्तदाबामुळे रक्तवाहिन्या आणि अवयवांचे नुकसान होते. त्याचा परिणाम हृदयावरदेखील होतो. यामध्ये तरुणांमधील उच्च दाबाचे निदान न झाल्यास किंवा अनियंत्रित राहिल्यास भविष्यात आरोग्यास धोका निर्माण होतो.

भारतातील लोकसंख्येतील उच्च रक्तदाब(१०१ दशलक्ष) आणि प्री डायबीटीज (१३७ दशलक्ष) लोकांचे प्रमाण लक्षात घेता, भविष्यात उच्च रक्तदाबाच्या आरोग्याचा (Health) धोक वाढू शकतो. परंतु आरोग्याची काळजी, रक्तदाब नियंत्रण, राहनीमानातील बदल आणि औषधे घेऊन हे धोके टाळता येऊ शकतात. WHO चा हा अहवाल आपल्यासाठी इशाराच आहे असे डॉ श्रीनाथ रेड्डी यांनी सांगितले.

भारताने २०२५ पर्यंत उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या ७५ दशलक्ष रुग्णांची काळजी (Diabetes) घेण्याचे ठरवले आहे. Who च्या रिपोर्टनुसार, उच्च रक्तदाबाचे निदान करणे आणि त्यावर काम करणे हे आरोग्य सेवेत सर्वात महत्त्वाचे आहे. जागतिक स्तरावर उच्च रक्तदाब तीनपैकी एका प्रौढ व्यक्तीमध्ये आढळून येतो. तर १.३ अब्ज लोकांमध्ये सर्वात जास्त लोकांना हा आजार होत असल्याचे दिसून आले. हा आजार ३० ते ७९ लोकांमध्ये आढळतो असा डेटा गोळा करण्यात आला आहे.

Hypertension Disease
Tea Side effects On Digestion: दिवसभरात २ पेक्षा जास्त वेळा चहा पिताय? होऊ शकतो पचनसंस्थेवर परिणाम

1. उच्च रक्तदाबाची कारणे

भारतातील सर्वात उच्च रक्तदाबाची (high blood pressure) कारणे मिठाचे सेवन करणे, तंबाखू खाणे, लठ्ठपणा, दारु पिणे, शारिरिक व्यायाम न करणे ही आहेत. अहवालानुसार, तंबाखूचा वापर आणि शारिरिक व्यायामाचा अभाव ही दोन मुख्य कारणे भारतातील लोकांमधील उच्च दाबाची कारणे आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com