Dementia Risk in Elderly Women
Daytime Sleepiness Health Risksgoogle

Daytime Sleepiness Risks: दिवसा झोप काढताय? सावधान! होऊ शकतो 'हा' जीवघेणा आजार

Brain Health : दिवसा वारंवार झोप घेणे मेंदूच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते. संशोधनानुसार अशा सवयीमुळे डिमेंशियाचा धोका वाढतो. वृद्धांनी झोपेच्या पद्धतीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
Published on

सध्याची जीवनशैली अचानक खूप बदलत चालली आहे. त्याचा परिणाम थेट झोपेवर होत आहे. त्यामुळे अनेकांच्या झोपेच्या वेळा सुद्धा बदलत चालल्या आहेत. काहींना कामामुळे रात्री झोप घेता येत नाही. त्यामुळे ते दुपारच्या वेळेस झोप घेणे पसंत करतात. त्याप्रमाणे त्यांच्या दिवसाचे वेळापत्रक ठरते. मात्र अलिकडच्या एका संशोधनातून एक महत्त्वपूर्ण बाब समोर आली आहे. ज्या महिलांना वयाच्या ८० व्या दशकात दिवसा झोप घेण्याची समस्या अधिक प्रमाणात जाणवते. त्यांना डिमेंशिया होण्याची शक्यता जवळपास दुप्पट असते. यामध्ये असे निश्चित झालेले नाही, तरी झोपेच्या पद्धती आणि डिमेंशिया यांच्यामध्ये महत्वाचे संबंध असल्याचे निष्कर्ष संशोधकांनी मांडले आहेत.

झोप ही मेंदूच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ती मेंदूला विश्रांती देऊन विचार करण्याची, शिकण्याची आणि गोष्टी आठवणीत ठेवण्याची क्षमता वाढवते. पण वय जसजसे वाढते, तसतसे झोपेच्या पद्धती आणि वेळा बदलतात. याच बदलांचा अभ्यास करताना अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. संशोधनात ७३३ महिलांचा समावेश होता. ज्यांचे सरासरी वय ८३ वर्षे होते. या महिलांना अभ्यास सुरू होताना स्मृती किंवा विचारांबाबत कोणतीही समस्या नव्हती. पाच वर्षांच्या कालावधीत या महिलांच्या झोपेचे नमुने काळजीपूर्वक तपासण्यात आले. त्यामध्ये दिवसा आणि रात्रीच्या झोपेची नोंद ठेवली गेली.

Dementia Risk in Elderly Women
Lal Bhoplyachi Bhaji : रोज बटाट्याची भाजी कशाला? झटपट करा टेस्टी लाल भोपळ्याची भाजी, वाचा रेसिपी

पाच वर्षांनंतर, १६४ महिलांमध्ये काही कमजोरी दिसून आली. तर ९३ महिलांमध्ये डिमेंशियाची लक्षणे आढळली. झोपेच्या पद्धतीनुसार या महिलांना तीन गटात विभागण्यात आले. पहिल्या गटातील महिलांची झोप स्थिर किंवा किंचित चांगली होती. दुसऱ्या गटातील महिलांची रात्रीची झोप कमी झाली होती. तर तिसऱ्या गटातील महिलांची दिवसा आणि रात्रीची झोप दोन्ही वाढली होती.

ज्या महिलांची रात्रीची झोप कमी झाली होती. त्यांच्यात झोपेची गुणवत्ता खालावली होती. अशा महिला दिवसा जास्त वेळ झोप घेत होत्या. ज्यामुळे त्यांची दिनचर्या विस्कळीत झाली होती. तिसऱ्या गटातील महिलांमध्ये मात्र दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा झोपेचा कालावधी वाढला, पण त्यांची झोपेची लय पूर्णपणे बिघडली होती. या निष्कर्षांवरून स्पष्ट होते की झोप ही फक्त रात्रीपुरती मर्यादित न ठेवता तिच्या सर्व पैलूंचा विचार केला पाहिजे. दिवसा वारंवार झोप घेणे आणि झोपेच्या लयीतील बदल वृद्धांच्या मेंदूच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात. त्यामुळे वृद्धांच्या झोपेच्या पद्धतीकडे अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे या अभ्यासातून अधोरेखित झाले आहे.

Dementia Risk in Elderly Women
Jio Plan : फक्त ७७ रुपयांत जिओचा नवा प्लॅन; मिळणार ३ जीबी डेटा अन् बरंच काही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com