Jamun Seeds: फक्त डायबिटीजसाठीच नाही तर 'या' समस्यांवर गुणकारी ठरतील जांभळाच्या बिया

Diabetes : उन्हाळ्यामध्ये आपण वेगवेगळी फळं खात असतो. त्यामध्ये जांभळांचा सुद्धा समावेश होतो. तुम्ही जांभूळ खाल्ल्यानंतर त्याच्या बिया फेकून देत असाल तर थांबा. जांभळाच्या बियांचे पुढे दिलेले फायदे एका नक्की वाचा.
Jamun Seeds
Diabetesgoogle
Published On

उन्हाळ्यामध्ये आपण वेगवेगळी फळं खात असतो. त्यामध्ये जांभळांचा सुद्धा समावेश होतो. जांभळांचा फायदा आपल्या शरीराला खूप फायदेशीर असतो. आयुर्वेदात जांभळांना विशेष महत्व असतं. जांभळांच्या बियांचे सेवन केल्याने पचनसंस्था सुधारते. जांभळांच्या बियांचे अनेक घरगुती उपाय सुद्धा लोकप्रिय आहेत. फक्त जांभळाच्या बियाच नाही तर त्याची पाने, मुळं, सालं यांचा समावेश आयुर्वेदामध्ये औषधे तयार करण्यासाठी केला जातो.

Jamun Seeds
Hair Dye: केसांना सतत कलर केल्याने होतील 'हे' दुष्परिणाम

जांभळांच्या बियांचे फायदे

आयुर्वेदाच्या 'चरक संहिता' या प्रसिद्ध ग्रंथात जांभळाचे अनेक फायदे दिले आहेत. त्यामध्ये कच्च्या जांभळे, पिकलेली जांभळे, फळ, पानं, मुळं अशा सगळ्याचा समावेश आहे. पुढे आपण जांभळांच्या बिया खाल्याने काय फायदा होतो? हे जाणून घेणार आहोत.

मधुमेहाने ग्रस्त असलेले रुग्ण

फार पुर्वीपासून तुम्ही ऐकत आला असाल की जांभळाच्या बिया मधुमेहींसाठी खूप फायदेशीर असतात. ते कसे? जाणून घेऊ.

सगळ्यात आधी जांभुळ खाल्ल्यानंतर त्या बिया उन्हात सुकवून घ्या. त्यांचा रंग बदलला आणि बिया कडक झाल्यावर पावडर वाटून घ्या. ही पावडर तुम्ही दिवसातून एक चमचा सेवन करू शकता. जे लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. त्यांच्यासाठी या बिया खूप फायदेशीर आहेत. कारण जांभळांच्या बिया शरीर डीटॉक्स करतात.

त्याने पोटातील किंवा शरीरातील घाण निघते. जांभळामध्ये अ‍ॅंटीऑक्सिडेंट्स असतात. त्याने शरीर फ्री रेडिकल्सपासून वाचतं. याशिवाय तुमच्या हार्ट हेल्थवर सुद्धा याचा परिणाम होतो. तुमच्या ह्दयाचं कार्य सुरळीत होतं, तर या बियांमध्ये असणारे अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म लिवरचे कार्य सुधारतात. याशिवाय ज्यांना वाढत्या वजनाची चिंता असते. त्यांच्यासाठी हे एक प्रोटीनचं आहे.

महत्वाची टिप

जांभळाच्या बियांचे चुर्ण सेवन करण्याआधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचे आहे. कारण या चुर्णामुळे तुम्हाला गॅस, पोट दुखी, पोटात जळजळ अशा समस्यांना सुद्धा सामोरं जावं लागू शकतं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Jamun Seeds
Batata Vada Recipe: संध्याकाळच्या चहासोबत करा बटाटा वड्याचा बेत; फक्त 5 सोप्या टिप्स करा फॉलो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com