

ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या शरीरातील क्रिया पूर्णपणे बंद होत नाहीत. या क्रिया वेगवेगळ्या अवयवांची ऑक्सिजनची गरज आणि रक्त प्रवाहावर अवलंबून असतात. त्यामुळे प्रत्येक अवयव एका विविध वेळी काम करणं बंद होतं. एखाद्या अवयवाची शटडाउन टाइमलाइन समजून घेतल्याने केवळ मृत्यूची प्रक्रिया स्पष्ट होत नाही तर कोणत्या अवयवांचं प्रत्यारोपण केलं जाऊ शकतं हे देखील स्पष्ट होते. मृत्यूनंतर कोणता अवयव पहिल्यांदा कार्य थांबवतो ते पाहूयात.
मृ्त्यूनंतर हृदयाचे ठोके थांबताच शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. मेंदूला सर्वात जास्त ऑक्सिजनची आवश्यकता असते. म्हणून त्याच्यावर पहिला परिणाम होतो. सुमारे 4 ते 7 मिनिटांच्या आत मेंदूच्या पेशी नष्ट होऊ लागतात. ज्यावेळी मेंदू कायमचं काम करणं थांबवतो तेव्हा त्याला 'ब्रेन डेथ' म्हणतात.
नैसर्गिक मृत्यूच्या बहुतेक प्रकरणांमध्ये, श्वासोच्छवासाबरोबर हृदयाची धडधड थांबली जाते. हृदयाचे ठोके थांबल्यानंतर रक्तप्रवाह संपतो आणि फुप्फुसंही काम करणं थांबवतात. परंतु रुग्णालयातील काही मशीनच्या मदतीने काही काळ अवयवांना ऑक्सिजन पुरवठा देता येतो. योग्य ती काळजी घेतल्यास हृदय आणि फुफ्फुसं सुमारे 4 ते 6 तासांनी प्रत्यारोपण करता येतात.
लिव्हर, पॅनक्रियाज आणि आतडं हे अवयव उर्जा आणि एंजाइमवर अवलंबून असतात. साधारणत: 8 ते 18 तासांच्या आत या अवयवांची कार्यक्षमता कमी होऊ लागते. जर हे थंड तापमानात जतन केले तर ते प्रत्यारोपणासाठी सुरक्षित राहतात.
किडनी हा तुलनेने अधिककाळ सुरक्षित राहणारा अवयव आहे. मृत्यूनंतर जर ते त्वरीत थंड वातावरणात जतन केले गेले तर ते 24 ते 36 तास प्रत्यारोपणासाठी सुरक्षित राहतात. त्याचप्रमाणे कॉर्निया हा ऑक्सिजनवर कमी अवलंबून असतो. त्यामुळे सुमारे १४ दिवसानंतर त्याचं दान केलं जाऊ शकतं. त्वचा आणि हाडे यासारख्या टिश्यूंचं योग्य पद्धतीने जतन केल्यास कित्येक दिवस ते वर्षानुवर्षे ते सुरक्षित राहतात.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.