Deepak on Diwali: पैसा-संपत्ती मिळवण्यासाठी कोणता दिवा लावावा? जाणून घ्या दिवाळीत दिवे लावण्याचे नियम

Light Up Deepak on Diwali 2024: हिंदू सणांमध्ये गणेशोत्सवानंतरचा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी मानला जातो. दिवाळीच्या दिवसांत धन तसंच संपत्तीला आकर्षित करण्यासाठी दिवे लावले जातात. मात्र हे दिवे लावण्याचे देखील खास नियम असतात.
Deepak on Diwali
Deepak on Diwalisaam tv
Published On

पुढच्या आठवड्यापासून दिवाळीला सुरुवात होणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवाळीला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण मानला जातो. या दिवशी अनेक दिवे लावले जातात. हिंदू सणांमध्ये गणेशोत्सवानंतरचा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी मानला जातो. यामध्ये वसुबारस, धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत हा सण संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

दिवाळीच्या दिवसांमध्ये घरात सुख-समृद्धी येण्यासाठी दिवे लावले जातात. असं मानलं जातं की, दिवाळीच्या दिवसांत धन तसंच संपत्तीला आकर्षित करण्यासाठी दिवे लावले जातात. मात्र हे दिवे लावण्याचे देखील खास नियम असतात. योग्य पद्धतीने दिवाळीच्या दिवशी दिवे लावल्यास घरात समृद्धी येते असं मानलं जातं.

Deepak on Diwali
Guru-Shani Vakri: दिवाळीत गुरु-शनी चालणार उलटी चाल; 'या' राशींना अचानक मिळणार भरपूर पैसे

कधी आहे दिवाळी?

यंदाच्या वर्षी 31 ऑक्टोबर 2024 रोजी येणाऱ्या कार्तिक अमावस्येच्या रात्री दिवाळी साजरी केली जाणार आहे. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीच्या आगमनासाठी हे दिवे लावण्यात येतात. दिवा लावल्याने घरात सुख-समृद्धी येते. पण यासाठी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे दिवा लावणं महत्त्वाचं आहे.

तुपाचा दिवा

धर्म आणि वास्तुशास्त्रानुसार दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीसमोर एक दिवा तुपाने लावला पाहिजे. हा दिवा तुपाचा असावा आणि इतर दिव्यांपेक्षा मोठा असला पाहिजे. असं मानलं जातं यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते.

दक्षिण दिशेला लावा एक दिवा

दिवाळीच्या दिवशी दक्षिण दिशेला एक दिवा लावला गेला पाहिजे. या दिशेला दिवा लावल्याने घरात नकारात्मकता येत नाही, असं मानलं जातं.

रक्षासूत्र दिवा

जर तुमची आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर तुम्ही रक्षासूत्र तुपाचा तुपाचा दिवा लावला पाहिजे. म्हणजे कापसाच्या वाती ऐवजी रक्षासूत्र वापरा. यामुळे घरात पैसा येण्याची शक्यता असते.

घराच्या मुख्यदारी लावा दिवा

जर तुमच्या आयुष्यान अनेक अडचणी असतील तर दिवाळीच्या दिवशी मुख्य दारावर तुपाचा दिवा लावा. त्यामुळे तुमची अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात. याशिवाय तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळू शकतं.

काय आहेत दिवे लावण्याचे नियम

कधीही एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये. या ऐवजी दिवा लावण्यासाठी मेणबत्ती, मॅचस्टिक किंवा लाइटरचा वापर करा. एक दिवा लावण्याऐवजी दुसरा दिवा लावल्याने तुमचं पैशांचं नुकसान होण्याचा धोका असतो.

Deepak on Diwali
Grah Gochar: दिवाळीपूर्वी ५ ग्रह बदलणार त्यांची चाल; 'या' राशींना लागणार भला मोठा जॅकपॉट, मिळणार नुसता पैसा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com