National Dengue Day : डेंग्यूचा ताप अधिक घातक कधी होतो ? या लक्षणांना चुकूनही करु नका दुर्लक्ष

Dengue Fever Treatment: मागच्या काही वर्षात डेंग्यूचा आजार हा प्रचंड प्रमाणात वाढत आहे.
National Dengue Day
National Dengue DaySaam Tv
Published On

Dengue Fever Symptoms: भारतात दरवर्षी १६ मे ला राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा केला जातो.गतिक आरोग्य संघटना या आजाराला हाडे मोडणारा ताप मानते. हा गंभीर आजार प्राणघातकही ठरू शकतो.

मागच्या काही वर्षात डेंग्यूचा आजार हा प्रचंड प्रमाणात वाढत आहे. या आजाराचा लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकालाच याचा सामना करावा लागतो. याची लक्षण हळूहळू दिसतात व नंतर वाढत जातात. जाणून घेऊया डेंग्यूचा ताप हा अधिक घातक कधी होते ते.

National Dengue Day
Dengue Disease : डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी 'या' फळांना आहारात सामिल करा !

डेंग्यूचा संसर्ग हा चार वेगवेगळ्या जातींच्या विषाणूंद्वारे पसरतो ज्याला सेरोटाइप म्हणतात. हे चारही अँटीबॉडीजवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतात. तापानुसार, डेंग्यू हा डेंग्यू हेमोरेजिक फीव्हर (DHF) आणि डेंग्यू शॉक सिंड्रोम (DSS) सारखे घातक प्रकार देखील घेऊ शकतो. याला गंभीर डेंग्यू असेही म्हणतात.

1. लक्षणे (Symptoms)

  • डेंग्यूची सुरुवात खूप ताप, डोकेदुखी, डोळ्यामागील वेदना, सांधे आणि स्नायूमध्ये तीव्र वेदना, थकवा, मळमळ, उलट्या, त्वचेवर पुरळ आणि भूक न लागणे या लक्षणांनी होते.

  • अनेक दिवसांनंतर, साधारणपणे ३-७ दिवसांनंतर, रुग्णाला डेंग्यूची गंभीर लक्षणे दिसू शकतात.

  • जसे की पोटदुखी (Stomach Pain), जलद श्वास घेणे, सतत उलट्या होणे, उलट्यामध्ये रक्त येणे, लघवीत रक्त येणे, शरीरात द्रव साचणे, हिरड्या आणि नाकातून रक्त येणे, यकृताच्या समस्या, प्लेटलेटची संख्या झपाट्याने कमी होणे आणि सुस्तपणा अस्वस्थ वाटणे.

  • अशा परिस्थितीत रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे.

National Dengue Day
Dengue Diet: डेंग्यूच्या रुग्णांची काळजी घ्यायची आहे ? आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा

2. डेंग्यू झाल्यास काय होते?

  • रुग्णाला गंभीर डेंग्यू झाल्यास त्याच्या त्वचेवर आणि शरीराच्या इतर भागांवर रक्तस्त्रावाचे डाग दिसू लागतात आणि रक्ताचा प्लाझ्मा गळू लागतो.

  • गंभीर डेंग्यू तापामुळे फुफ्फुस, यकृत किंवा हृदयाचे नुकसान होते.

  • रुग्ण बेशुद्ध अवस्थेत पोहोचतो.

  • कधीकधी रक्तदाब अचानक धोकादायक पातळीपर्यंत खाली जातो, ज्यामुळे रुग्णाला धक्का बसतो आणि काही प्रकरणांमध्ये मृत्यू देखील होऊ शकतो.

  • ज्या लोकांना आधीपासून आजार (Disease) आहे त्यांना गंभीर डेंग्यूचा धोका जास्त असतो.

National Dengue Day
Sonalee Kulkarni : तेरे आँखो का ये काजल मुझे.... घायल

3. उपचार

  • या प्रकारच्या डेंग्यू तापाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला आयसीयूमध्ये उपचार करावे लागतात.

  • लक्षणांवर अवलंबून, रुग्णावर रक्त किंवा प्लेटलेट संक्रमण, इंट्राव्हेनस फ्लुइड आणि ऑक्सिजन थेरपीद्वारे उपचार केले जाऊ शकतात.

  • उपचारास उशीर झाल्यास रुग्णाचे अनेक अवयव निकामी होऊन मृत्यूचा धोका वाढतो.

  • त्यामुळेच डॉक्टर डेंग्यूची कोणतीही लक्षणे गांभीर्याने घेण्याचा सल्ला देतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com