अँल्युमिनिअमची भांडी काळी झाली असतील तर काय कराल ?

आजकाल बहुतेक घरांमध्ये अँल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर खूप प्रमाणात वाढला आहे.
How to clean aluminum utensils
How to clean aluminum utensils ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On: 

मुंबई : घरातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे त्या घराचे स्वयंपाकघर. यामुळेच घरातील स्त्रीवर्गाचे स्वयंपाकघरातील साफसफाईकडे विशेष लक्ष दिले जाते. स्वयंपाकघरात रोज वापरलेली भांडी जवळपास दररोज स्वच्छ केली जातात. या भांड्यांपैकी एक कढई देखील आहे, जी दिवसातून किमान दोनदा वापरली जाते आणि ती तेवढ्याच वेळा स्वच्छ (Clean) केली जाते, परंतु दररोज साफसफाई करूनही तिचा काळपटपणाचा निघत नाही.

हे देखील पहा-

आजकाल बहुतेक घरांमध्ये अँल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर खूप प्रमाणात वाढला आहे. काही काळापूर्वी घरांमध्ये लोखंडी भांड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता, परंतु आता बहुतेक घरांमध्ये अँल्युमिनियमच्या भांड्यांनी जागा घेतली आहे. अँल्युमिनियमची भांडी साफ करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. अशावेळी आपण ती स्वच्छ कशी करावी ते पाहणार आहोत.

अँल्युमिनियमची भांडी अशा पध्तीने साफ करा.

१. जळलेल्या कढईचे डाग काढायचे असतील तर, कढई गॅसवर (Gas) ठेवून त्यात ३-४ ग्लास पाणी टाका. नंतर त्यात २ चमचे डिटर्जंट पावडर आणि १ चमचा मीठ, अर्धा लिंबाचा रस घाला. यानंतर पाणी सुमारे ५ मिनिटे चांगले उकळू द्या. असे केल्यास कढईचे डाग निघण्यास मदत होईल.

२. कढई किंवा तवा मागून काळा झाला असेल तर, एका मोठ्या भांड्यात गरम पाणी (Water) घेऊन त्यात १५ मिनिटे पॅन बुडवून ठेवा. तसेच, पॅनमध्ये एक चमचा बेकिंग सोडा आणि डिटर्जंट मिसळा. सॅन्ड पेपरच्या मदतीने हे मिश्रण पॅनवर लावून स्वच्छ करा. हे करताना गरम पाणी सतत वापरत राहा.

How to clean aluminum utensils
आठवडाभर केळी ताजी ठेवण्यासाठी काही सोप्या युक्त्या

३. जळलेला तवा स्वच्छ करण्यासाठी पॅनमध्ये एक चमचा बेकिंग सोडा, २ चमचे लिंबाचा रस आणि २ कप गरम पाणी घाला. यानंतर, पॅन स्टीलच्या स्क्रबरने घासून स्वच्छ करा. पॅन नव्यासारखा चमकू लागेल.

४. जळलेले तवा किंवा कढई स्वच्छ करण्यासाठी टोमॅटोच्या रसाचाही खूप उपयोग होतो. तव्यावर टोमॅटोचा रस आणि पाणी टाकून गरम करायला ठेवा. पाणी गरम झाल्यावर तवा घासून स्वच्छ करा.

५. सततच्या वापरामुळे अँल्युमिनियमची भांडी काळवंडायला लागली असतील तर, त्यात मीठ आणि पाणी घालून उकळून घ्या. पाच मिनिटे पाणी उकळल्यानंतर, डिशवॉशिंग ब्रशने डाग स्वच्छ करा. या वापराने डाग साफ होतील.

अशाप्रकारे आपण अँल्युमिनियमची भांडी साफ करु शकतो.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com