आठवडाभर केळी ताजी ठेवण्यासाठी काही सोप्या युक्त्या

केळीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आदी मुबलक प्रमाणात आढळतात.
How to keep Banana fresh for a week
How to keep Banana fresh for a weekब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On: 

मुंबई : केळी हे असे फळ आहे की, प्रत्येक ऋतूत तर मिळते आणि लहानापासून- मोठ्यापर्यंत सर्वाना खायला आवडते. केळीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आदी मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे शरीराला हवे असणारे पोषक घटक मिळतात. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि लोह भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्या हृदय, किडनी, पचनसंस्था इत्यादींना निरोगी ठेवण्यास मदत होते. याशिवाय यामध्ये असणाऱ्या एंजाइममुळे शरीराला अनेक घातक आजारांपासून वाचवण्यास मदत होते. परंतु, केळी खरेदी करताना ती अधिक काळ कशी टिकेल हा प्रश्न सर्वांनाच पडतो. केळी खरेदी केल्यानंतर त्याची साठवणूक कशी करावी, ती आठवडाभर कशी टिकवावी याविषयी काही टिप्स (Tips) देणार आहोत.

हे देखील पहा -

केळी खराब होण्यापासून कसे वाचवायचे.

१. केळी अधिक काळ ताजी ठेवण्यासाठी केळीच्या देठावर फॉइल पेपर गुंडाळा. जर आपल्याकडे फॉइल पेपर नसेल तर ते प्लास्टिक किंवा कागदाने गुंडाळा. असे केल्यास केळी लवकर खराब होत नाही.

२. आपण केळी जमिनीवर किंवा किचनमधे ठेवतो त्यामुळे ती लवकर खराब होते. केळी लवकर खराब होऊ नये म्हणून केळी हॅन्गरमध्ये लटकवा. हॅन्गर नसेल तर त्याच्या देठात धागा बांधून लटकवावे. याच्या मदतीने केळी अनेक दिवस टिकते.

How to keep Banana fresh for a week
कमी किंमतीत अशी करा भाज्यांची निवड !

३. केळी जास्त काळ टिकवून ठेवायची असेल तर व्हिटॅमिन सी ची टॅबलेट घरीच (Home) ठेवल्यास फायदा होऊ शकतो. व्हिटॅमिन (Vitamins) सी ची गोळी पाण्यात विरघळवून त्यात एक केळ भिजवा. केळी सडणार नाहीत.

४. चुकूनही केळी फ्रीजमध्ये ठेवू नये. केळी फ्रीजमध्ये ठेवल्यास ती लवकर खराब होतात. अशावेळी आपण केळी खोलीच्या तापमानात ठेवावी.

५. केळी खराब होऊ नयेत म्हणून त्यांना वॅक्स पेपरने झाकून ठेवा. असे केल्याने केळी बरेच दिवस ताजी राहतील.

अशाप्रकारे केळी अधिक काळ टिकून राहण्यास मदत होईल.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com