

मुंबई : साधारणतः आपण भाजी (Vegetable) खरेदी करायला गेल्यानंतर आठवड्याभराच्या भाज्या घेऊन येतो. त्यामुळे अशा भाज्या घेणे गरजेचे असते, तसेच त्या काही दिवस टिकणे गरजेचे असते. आपण सगळेच भाजी खरेदी करतो. परंतु ती खरेदी करताना, तिच्या किंमतीव्यतिरिक्त, आपण तिच्याकडे फारसे लक्ष देत नाही. पण भाजी खरेदी करताना त्याची किंमत, दर्जा आणि ती ताजी आहे की नाही याकडे पूर्ण लक्ष आपण दिले पाहिजे. कमी किंमतीतून आपल्याला परवडणाऱ्या दरात भाजीपाला मिळतोय, इतकेच पुरेसे नसते. भाजी खरेदी करायला जाताना आपल्याला काही टिप्स (Tips) आणि युक्त्या माहित असणे आवश्यक आहे, ज्याच्या मदतीने आपल्याला परवडणाऱ्या किंमतीत चांगली भाजी खरेदी करु शकतो.
हे देखील पहा -
कशी कराल भाज्यांची निवड
१. भाजी काही काळ टिकवण्यासाठी ती सर्व बाजूंनी तपासून पहा. कोणत्याही बाजूने खराब किंवा कुजणार नाही असे पहा. अनेक वेळा खराब झालेल्या भाज्यांचे डाग आपल्याला दिसत नाही. त्यामुळे त्यांना नीट तपासून पाहिल्यानंतरच खरेदी करा.
२. आपण पॅकेज केलेल्या भाज्या घेताना लक्षात ठेवा की त्या ताज्या आहेत की नाही. मशरूम, कॉर्न, स्प्राउट्स इत्यादींची पाकिटे नाकापासून काही अंतरावर ठेवून त्याचा वास घेऊ शकता. ज्यामुळे ते जुने किंवा खराब झाले असतील तर त्यांच्या वासाने आपल्याला कळेल.
३. भाजीपाला घेताना त्या कमी दरात मिळत असतील ते अधिक प्रमाणात घेऊ नका. काही भाज्या जास्त काळ टिकतात, तर काही जास्त काळ ठेवता येत नाहीत. त्यामुळे पालेभाज्या घेताना कोथिंबीर, टोमॅटो आदी गरजेनुसार घ्याव्यात.
४. जेव्हा तुम्ही भाज्या, विशेषत: टोमॅटो, कांदे (Onion), बटाटे इत्यादी घेता असताना त्यांना हलके दाबून पहा ज्यामुळे ते कळेल की, त्या आतून खराब नाहीत. कधी कधी भाज्या बाहेरून टवटवीत दिसतात, पण आतून खराब असतात. त्यामुळे भाज्या खरेदी करताना काळजी घ्या.
५. पालेभाज्या घेताना लक्षात ठेवा की, त्यांची पाने पिवळी किंवा थोडीशीही खराब असतील तर ती लगेच खराब होतील. अशावेळी, कीटक देखील त्यांच्या दरम्यान असू शकतात. त्याचबरोबर पालेभाज्या जास्त पाण्यात भिजवल्या जाऊ नयेत हेही लक्षात ठेवा. त्याहीपेक्षा ते अधिक लवकर खराब होतात. त्यामुळे स्वच्छ भाज्याच घ्याव्यात.
अशाप्रकारे भाज्यांची निवड करुन आपण पैशांची बचत करु शकतो.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.