मुंबई : एकादशी आणि दुप्पट खाशी ही म्हण तितकीही खोटी नाही. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते. या दिवसाचा उत्साह आपण काही महिन्यापासून पाहात आहोत.
हे देखील पहा -
या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक वारकरी कानाकोपऱ्यातून पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. या दिवसाचे महत्त्व वेगळे आहे. या दिवशी असंख्य पाडुरंगाचे भक्त आवर्जून अगदी भक्तीभावाने पूजा, अर्चना व उपवास करतात. उपवासाच्या दिवशी बरेच लोक भाज्यांचे देखील सेवन करतात पण नेमके त्यादिवशी आपला आहार कसा असायला हवा? आपल्या थाळीत कोणते उपवासाचे आरोग्यदायी पदार्थ असायला हवे ते पाहूया.
खरेतर उपवास म्हटलं की, आपल्या ताटात साबूदाण्याची खिचडी किंवा वडा, भगर, दूध किंवा खीर, राजगिरा असे अनेक उपवासाचे पदार्थ आपण खातो. आपल्या कुटुंबातील (Family) एकाचा उपवास असला की, संपूर्ण कुटुंबाची खाण्याच्या बाबतीत मज्जा असते. या दिवशी आपल्या थाळीत आरोग्यदायी पदार्थ असणे अधिक गरजेचे आहे. ज्यामुळे आपल्या अपचनाचा त्रास होणार नाही व आपण उपवास देखील करु शकतो. उपवासाच्या दिवशी आपल्या खाण्यापिण्यात अधिक बदल घडलेले दिसतात. अधिक काळ काही न खाल्यास आपल्याला त्रास होऊ लागतो किंवा त्या दिवशी आहारात असे काही पदार्थ खाल्यास आपल्याला दुसऱ्या दिवशी आरोग्यासंबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
आपण थाळीत भाजेलेले शेंगदाणे व गूळापासून लाडू बनवू शकतो. या लाडवाचे सेवन केल्यास आपल्या उपवासाच्या दिवशी ऊर्जा मिळेल. या दिवशी आहारात (Food) आपण गोड दही व साबुदाणा वडा, वरईचा भात, शेंगदाण्याची आमटी व उपवासाची बटाट्याची भाजीचा आहारात समावेश करू शकतो.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.