मुंबई : अनेकांना झोपेत घाम येतो व भीती वाटते. आपल्या सतत कोणी तरी दाबत आहे किंवा आपण उंचावरून खाली पडत आहोत असे सतत वाटत असते.
हे देखील पहा-
अशा परिस्थित झोपल्यानंतर आपण स्वत:ला वाचवण्यासाठी मदतीसाठी (Help) हाका मारतो पण आपला आवाज निघत नाही किंवा जागेवरुन आपण हलू शकत नाही अशी आपली अवस्था होते. अर्धांगवायू, लकवा किंवा पक्षाघात हे एकाच आजारांचे (Disease) अनेक लक्षणे आहेत. झोपेतून उठल्यानंतर आपल्याला शरीराची कोणत्याही प्रकारची हालचाल न होणे. आपण उठण्याचा प्रयत्न करुन सुध्दा शरीर आपल्याला प्रतिसाद देत नसल्या स्लिप पॅरालिसिस होऊ शकतो. या अवस्थेत आपल्या मेंदूला गोष्टी कळत असतात पंरतु, आपले शरीर हालचाल करायला मागत नाही. जाणून घेऊया स्लिप पॅरालिसिस काय आहे व त्याची कारणे कोणती
स्लिप पॅरालिसिस ही एक अशी अवस्था आहे ज्यात आपण झोपेतून उठल्यानंतर आपल्या शरीराला अर्धांगवायू झाल्याचे कळते. अशा परिस्थितीत आपण शरीराचा कोणताही भाग हलवू शकत नाही. झोपेच्या विकारांनी ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात दिसून येतो.
कारण -
झोपेचा अभाव किंवा व्यवस्थित झोप न घेतल्यास स्लिप पॅरालिसिस होऊ शकतो. गाढ झोपेत डोळ्यांच्या बाहुल्या वेगाने फिरू लागतात. ज्याला रॅपिड आय मूव्हमेंट असे म्हटले जाते. काही मानसिक विकार व बायपोलर डिसऑर्डरच्या स्थिती, जास्त ताण घेणे, नार्कोलॅप्सीमध्ये झोपेवर नियंत्रण राहत नाही. अशावेळी काही भावनिक गोष्टींच्या विचारात गुंतून जातो किंवा भास होऊ शकतात अशी त्याची मुख्य कारणे आपल्याला जाणवतात.
तज्ज्ञ म्हणतात की, ,स्लिप पॅरालिसिस भयावह आहे परंतु तो प्राणघातक नाही. यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून त्यावर योग्य उपचार केले पाहिजेत. स्लीप पॅरालिसिस हा आजार नाही. हे केवळ झोपण्याच्या पद्धतीतील असंतुलनामुळे होते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.