मुंबई : प्रत्येक पालकांना आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी असते. पालकांना असे वाटते की, मुलांची उंची ही त्याच्या वयोमानानुसार अधिक असावी.
हे देखील पहा -
काही मुले ही आनुवंशिकतेनुसार अधिक उंच असतात तर काहींची उंची ही त्याच्या वयोमानानुसार कमी असते. मुलांची उंची ठरवण्यात त्याची जीन्स महत्त्वाची भूमिका ठरवते. काही पालक मुलांच्या वाढीसाठी काही औषधांचा वापर करतात पण वाढत्या वयात मुलांना औषधे दिल्यास त्यांच्या आरोग्यावर (Health) परिणाम होऊ शकतो. तसेच मुलांच्या वाढीदरम्यान ते कोणते अन्नपदार्थ खातात. ते कोणत्या प्रकारचे व्यायाम करतात. मुलांची उंची वाढवण्यासाठी कोणती योगासने (Yoga) करायला हवे हे जाणून घेऊया. (How To Increase Child's Height)
१. बाळाच्या उंची वाढवण्यासाठी योग्य पोषण द्यायला हवे. आहारामध्ये प्रथिने, कर्बोदके, चरबी आणि जीवनसत्त्वे यांचे योग्य प्रमाण असायला हवे. मुलांच्या वाढीदरम्यान जंक फूड व वातायुक्त पेयांपासून दूर होतील.
२. झिंकचा मुलांच्या वाढीवर मोठा परिणाम होतो. आपल्या आहारात शेंगदाण्याचा आहारात समावेश करणे महत्त्वाचे आहे. संतुलित आहार बाळाच्या केवळ उंची वाढवण्यासाठी योग्य पोषक तत्वाबरोबर त्यांना आतूनही मजबूत करतात.
३. पालकांनी मुलांच्या वाढीकरिता धनुरासन, पादहस्तासन, पश्चिमोत्तानासन यांसारखे योग नियमित करुन घ्यायला हवे. त्यामुळे मुलांची उंची वाढू शकते. तसेच योग केल्याने मुलांच्या आरोग्य सुधारण्यास मदत होते. योग्य पोषक तत्व व आरोग्यदायी पदार्थांचे सेवन केल्यास मुलांच्या वाढीत फरक जाणवेल. ((Tips To Grown Your Child's Height))
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited By - Komal Damudre
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.