Yellow Nail Syndrome: सावधान ! तुमची नखे देखील पिवळी पडली आहेत ? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण, जाणून घ्या कारण

What Is Yellow Nail Syndrome?: वारंवार नखांचे सौंदर्य जपून देखील तुमची नखे पिवळी पडत असतील तर?
Yellow Nail Syndrome
Yellow Nail SyndromeSaam Tv
Published On

Yellow Nail Syndrome Symptoms: नखांच्या सौंदर्यासाठी आपण अनेक प्रकारचे महागड्या उत्पादनांचा वापर करतो. यामुळे आपल्या नखांचे सौंदर्य अधिक सुंदर होते. नखांची वाढ, नेलपेट व त्यावर केलेली नेल आर्टयामुळे नखे अधिकच सुंदर दिसू लागतात.

परंतु, वारंवार नखांचे (Nails) सौंदर्य (Beauty) जपून देखील तुमची नखे पिवळी पडत असतील तर ? याचे कारण आपण जाणून घ्यायला हवे. तुमची देखील नखे पिवळी पडतात का ? नखे पिवळी पडणे म्हणजे काय ? जाणून घेऊया याबाबत सविस्तर

Yellow Nail Syndrome
Best Day to Cut Nails : नखे कापण्यासाठी हा दिवस शुभ;अचानक होईल धनलाभ, नाहीतर दारिद्रयाचा करा सामना

1. यलो नेल सिंड्रोम म्हणजे काय ?

'यलो नेल सिंड्रोम' हा एक अतिशय दुर्मिळ आजार (disease) असून तो हाता पायांच्या नखांना संसर्ग करतो. ज्या व्यक्तींना 'यलो नेल सिंड्रोम' असते त्यांच्यामध्ये फुफ्फुस आणि सिम्फॅटिक सिस्टिमच्या समस्या पाहायला मिळतात. या आजारात नखांच्या खाली असलेले 'लिम्फ' नखांना पिवळे दाखवू लागते म्हणून याला 'यलो नेल सिंड्रोम' असे म्हणतात.

हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीस होऊ शकतो, परंतु सामान्यतः हा आजार 50 वर्षे वयोगाटाच्या वरील व्यक्तींमध्ये प्रामुख्याने आढळतो. सिम्फॅटिक सिस्टिम आपल्या शरीरातील इम्यूनिटी सिस्टिमचा एक महत्त्वाचा भाग आहे. जो आपल्या शरीराला रोगांपासून लढण्यासाठी रोगप्रतिकारक पेशी 'लिम्फ'ला वाहून नेण्यास मदत करतात. यात कोणत्याही प्रकारची समस्या आल्यास लिम्फ वाढवण्यास मदत होऊ शकते. यामुळे नखे पिवळी होण्याबरोबरच शरीराच्या विविध भागांना सूज देखील येऊ शकते.

Yellow Nail Syndrome
Gel Nail Polish Side Effects : सावधान ! नखांचे सौंदर्यं वाढवण्यासाठी जेल नेल पॉलिशचा वापरताय ? आधी परिणाम जाणून घ्या

2. कोणाला होऊ शकतो 'यलो नेल सिंड्रोम' ?

  • ज्यांना लिंफोना, लंग्स कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर सारखे आजार असतात त्या लोकांना हा आजार होण्याची शक्यता असते.

  • FOXC2 जनुकिय बदल किंवा म्यूटेशनमुळे पायांना सूज येऊ शकते.

  • अशा परिस्थितीत यामुळे लिफेंडेमा, लिम्फ सर्क्युलेशन आणि ड्रेनेज अशा समस्या उद्भवू शकतात.

3. काय आहेत 'यलो नेल सिंड्रोम' ची लक्षणेः

  • सतत खोकला येणे

  • श्वास घेण्यास त्रास होणे

  • निमोनियासारखे ब्रीद इन्फेक्शन

Yellow Nail Syndrome
Care Of Artificial Nails : आर्टिफिशल नखांची काळजी घेण्यासाठी काही खास टिप्स

4. कसे केले जाते 'यलो नेल सिंड्रोम'चे निदानः

डॉक्टर्स 'यलो नेल सिंड्रोम' चे निदान तीन लक्षणांच्या आधारे करतात. ज्यात नखे पिवळी होणे, लंग प्रॉब्लेम जसे की, खोकला ब्रॉन्काइक्टेसिस आणि खालच्या अंगाला सूज येणे यांचा समावेश आहे. जर तुम्हाला ही तिन्ही लक्षणे जाणवत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

5. 'यलो नेल सिंड्रोम' मध्ये उद्भवणाऱ्या समस्याः

यलो नेल सिंड्रोम तुमच्या फुफ्फसांवर परिणाम करते आणि एक गंभीर आजार ठरु शकते. ब्रॉन्काइक्टेसिस म्यूकस सारखी फुफ्फुसाची समस्या निर्माण करून श्वास घेण्यास अडथळा निर्माण करू शकते. ज्यामुळे निमोनियासारखा आजार होऊ शकतो. जर हा द्रव फुफ्फुसाच्या पडद्याला झाकून टाकत असेल तर तुमची प्रकृती बिघडू शकते.

Yellow Nail Syndrome
Gel Nail Polish : जेल नेल पॉलिश ड्रायर वापरताय तर सावधान ! होऊ शकतो कॅन्सर, 'या' लक्षणांना दुर्लक्ष करू नका

6. काय आहेत 'यलो नेल सिंड्रोम' वरचे उपायः

  • तसे पहायला गेले तर, या आजारावर कायमचा असा उपाय नाही. परंतु आपण याच्या काही लक्षणांवर उपचार करू शकतो. जसे की-

  • फुफ्फुसाच्या उत्सर्जनावर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया.

  • फुफ्फुसांचा आजार आणि ब्रॉन्काइक्टेसिसवर उपचार करण्यासाठी अॅंटिबॅक्टेरीया.

  • लक्षणे दूर करण्यासाठी कॉर्टिकोस्टिरॉईड्स.

  • ब्लड सर्क्युलेशन आणि सूज कमी करण्यासाठी व्यायाम.

7. या आजाराला कसे रोखाल ?

आपण 'यलो नेल सिंड्रोम' हा आजार होण्यापासून थांबवू शकत नाही. पण त्याच्या लक्षणांना ओळखून त्यांच्यावर उपाय आणि नियंत्रण मिळवू शकतो. जर तुम्हाला वरील लक्षणांपैकी कोणती लक्षणे जाणवत असतील तर आजच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com