Aphasia म्हणजे काय, त्याची लक्षणे काय आहेत? तज्ज्ञांनी काय सांगितलं?

Aphasia Meaning and Symptoms in Marathi: बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम थेट व्यक्तींच्या आरोग्यावर होतो. अनेक आरोग्यासंबंधित नव नवीन आजारांचा सामना व्यक्तींना करावा लागत आहे. त्यातच मेंदूशी संबंधित अनेक आजार व्यक्तींना जडत आहेत,त्यातील अॅफेसिया हा मेंदूशी संबंधित एक आजार आहे.
Aphasia म्हणजे काय, त्याची लक्षणे काय आहेत? तज्ज्ञांनी काय सांगितलं?
SeniorGoogle

डॉ. प्रदीप महाजन, रीजनरेटिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट आणि स्टेमआरक्य हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक

बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम थेट व्यक्तींच्या आरोग्यावर होतो. अनेक आरोग्यासंबंधित नव नवीन आजारांचा सामना व्यक्तींना करावा लागत आहे. त्यातच मेंदूशी संबंधित अनेक आजार व्यक्तींना जडत आहेत,त्यातील अॅफेसिया हा मेंदूशी संबंधित एक आजार आहे. ज्या आजारामध्ये मेंदू संवाद साधण्याची संपूर्ण क्षमता गमावतो.त्याचा थेट परिणाम हा आजार झालेल्या व्यक्तीच्या बोलण्याच्या तसेच लिहिण्याच्या शिवाय गोष्टी समजण्याच्या क्षमतेवर होतो. अनेक संशोधक आणि तज्ज्ञांद्वारे स्पीच आणि भाषेसंबंधित असणाऱ्या थेरीपीने सकारात्मक परिणामांसाठी विविध तंत्रे शोधली जात आहेत. त्यांपैकी, 'रिपीटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन' म्हणजेच (RTMS)साहाय्याने अशा हा आजार झालेल्या व्यक्तींमध्ये उपचार केले जातात.

Aphasia म्हणजे काय, त्याची लक्षणे काय आहेत? तज्ज्ञांनी काय सांगितलं?
Skin Care Tips: चेहऱ्यावरील तेलकटपणा आणि पिंपल्स दूर करण्यासाठी तुळस ठरेल रामबाण उपाय; अशी पद्धतीने करा वापर

रिपीटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन (RTMS)

व्यक्तीला यामध्ये इलेक्ट्रिक शॉकऐवजी वेगळ्या पद्धतीने चुंबकीय क्षेत्र दिले जातात. या प्रक्रियेत भाषा प्रक्रियेशी संबंधित क्षेत्रांवर मज्जासंस्थेसंबंधी क्रिया सुधारण्याच्या आणि अ‍ॅफेसिया असलेल्या रूग्णांमध्ये भाषेच्या विकासाकरिता प्रयत्न केला जातो. पंरतू या क्षेत्रातील प्रसिध्द संशोधक डॉ. प्रदीप महाजन, हे यावर उपचार करण्यासाठी आरटीएमएसच्या वापराबाबत अभ्यास करत आहेत.

आरटीएमएस हे इतर उपायांपेक्षा फायदेशीर ठरत असून कमीत कमी दुष्परिणामांसह ही थेरेपी प्रभावी ठरते. मेंदूच्या शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेसह आक्रमक प्रक्रियेच्या तुलनेत आरटीएमएसला ऍनेस्थेसिया किंवा दीर्घ पुनर्प्राप्ती कालावधीची आवश्यकता भासत नाही आणि ते सुरक्षित ठरते.

Aphasia म्हणजे काय, त्याची लक्षणे काय आहेत? तज्ज्ञांनी काय सांगितलं?
Karela Recipe Cooking Tips : कारल्याच्या भाजीतला कडवटपणा ५ मिनिटांत गायब करण्याची ट्रिक; लहान मुलंही करतील फस्त

आरटीएमएसचा उपचार घेतलेल्या रूग्णांमध्ये भाषण कौशल्य विकास, भाषा आकलन आणि संवाद कौशल्यामध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. आरटीएमएस वाचाविकाराच्या रुग्णांसाठी एक अग्रगण्य भाषण कौशल्य सुधारण्यास फायदेशीर थेरेपी ठरत आहे.

Aphasia म्हणजे काय, त्याची लक्षणे काय आहेत? तज्ज्ञांनी काय सांगितलं?
Skin Care Tips: चेहऱ्यावरील तेलकटपणा आणि पिंपल्स दूर करण्यासाठी तुळस ठरेल रामबाण उपाय; अशी पद्धतीने करा वापर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com