अकोल्यात तिसरी दुर्दैवी घटना, कूलरचा शॉक लागून युवकाचा मृत्यू, कुटुंब शाेकसागरात

घरातील कूलर बंद पडले म्हणून नितीन याने कूलर चालू करायचा प्रयत्न केला. कूलरला स्पर्श करताच त्यांना विजेचा धक्का बसला. त्यानंतर त्यांच्या अंगावर कूलर पडला.
akola youth passed away due to electric shock
akola youth passed away due to electric shockSaam Digital

- अक्षय गवळी

अकोल्यात पुन्हा कुलरचा शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना समाेर आली आहे. अकोला जिल्ह्यातील मळसुर गावात ही दुःखद घटना घडली आहे. कुलर चालू करत असताना कूलरला स्पर्श झाल्यानं युवकाला जोरदार विजेचा शॉक लागला. त्यात त्याचा मृत्यू झाला. नितीन गजानन वानखडे असं मृताचे नाव आहे. (Maharashtra News)

यापूर्वी कूलरच्या शाॅकमुळे अकाेला येथे 7 वर्षीय चिमुकलीसह एका पोलिसाचा मृत्यू झाला. आता पुन्हा एका 38 वर्षीय नितीन गजानन वानखडे याचा मृत्यू झाला. नितीन हे कामावरुन घरी परतले. घरातील कूलर बंद पडले म्हणून त्यांनी कूलर चालू करायचा प्रयत्न केला. कूलरला स्पर्श करताच त्यांना विजेचा धक्का बसला. त्यानंतर त्यांच्या अंगावर कूलर पडला.

akola youth passed away due to electric shock
Lasalgaon Bandh Today : जलवाहिनी योजनेची एसआयटी चौकशी करा, लासलगावकरांचा मतदानावर बहिष्कार, Video

ही घटना त्यांचे वडील व पत्नीच्या लक्षात येताच त्यांनी विद्युत पुरवठा खंडित केला. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना उपचारार्थ अकोला येथे नेण्यात आले. तेथे पोहोचण्यापूर्वी वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

akola youth passed away due to electric shock
मतदान होताच नीरेचे पाणी बंद, पंढरपूरसह माळशिरसचे शेतकरी हतबल; रणजितसिंह मोहिते पाटलांनी घातलं लक्ष, साेमवारी...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com