

आजकाल हार्ट अटॅक केवळ वृद्धांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. चुकीची जीवनशैली, ताणतणाव, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि अनियमित खाण्याच्या सवयींमुळे तरुण वयातही हृदयाच्या समस्या झपाट्याने वाढतायत. या गंभीर समस्यांपैकी एक म्हणजे हृदय निकामी होणं. ही अशी स्थिती आहे, ज्यात हृदय योग्य प्रकारे रक्त पंप करू शकत नाही. ही स्थिती शरीरात हळूहळू विकसित होते. वेळेवर उपचार करणं आवश्यक आहे अन्यथा स्थिती गंभीर आणि जीवघेणी देखील होऊ शकते. त्यामुळे, हृदय निकामी होण्याची सुरुवातीची लक्षणे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. त्यामुळे ते निरोगी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळी हृदय निकामी होण्यास सुरुवात होते तेव्हा काही विशिष्ट लक्षणं जाणवू शकतात. हृदय निकामी होण्याची लक्षणं हळूहळू सुरू होतात. अनेक लोक हा सामान्य थकवा किंवा वाढत्या वयाचे परिणाम समजून दुर्लक्ष करतात.
जर तुम्हाला काही पायऱ्या चढल्यानंतर वेगाने चालल्यानंतर किंवा काही काम केल्यानंतर धाप लागली तर हे हृदय निकामी होण्याचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. अनेक लोकांना रात्रीच्या वेळी श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
हार्ट अटॅकमुळे तुम्हाला लवकर थकवा किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. हृदयाच्या समस्यांमध्ये हृदय योग्यरित्या रक्त पंप करू शकत नाही. या स्थितीमुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.
पाय आणि घोट्यांना येणाऱ्या सुजेकडे दुर्लक्ष करू नका. हे हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. यामुळे शरीरात द्रव जमा होतो, ज्यामुळे पाय, घोटे आणि पोटात सूज येते.
जर तुम्हाला सतत खोकला येत असेल तर ते हार्ट फेल्युअरचं लक्षण असू शकतं. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसांमध्ये पाणी साचतं. यामुळे खोकला, छातीत जडपणा किंवा श्वास घेताना घरघर होऊ शकते.
हार्ट फेल्युअरमध्ये हृदयाचे ठोके वाढू शकतात. यावेळी शरीरात पाणी साचल्यामुळे वजन वाढू शकते.
हार्टच्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. त्यामुळे काही विशिष्ट प्रकरणांमध्ये डॉक्टरांना भेटणं आवश्यक आहे-
श्वास घेण्यास तीव्र त्रास होणं
छातीत दुखणं
बेशुद्ध होणं
शरीरावर सूज येणं
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.