The History of Soap : साबण नव्हता तेव्हा लोक अंघोळीसाठी काय वापरायचे?

The History of Soap and Bathing: बाजारात गेल्यानंतर आपण खरेदी करत असतो.घरगुती वापराच्या वस्तूंमध्ये महत्वाची वस्तू म्हणजे साबण.त्या बद्दलची एक खास माहिती संशोधकांना सापडली.
Health care
Health careSAAM TV
Published On

बाजारात गेल्यानंतर आपण खरेदी करत असतो.घरगुती वापराच्या वस्तूंमध्ये महत्वाची वस्तू म्हणजे साबण. त्यात प्रत्येकासाठी वेगवेगळ्या ब्रॅंडचे, रंगाचे आणि सुगंधाचे साबण आपण विकत घेतो.साबणाचा शोध लागण्यापूर्वी लोक काय वापरायचे? असा प्रश्न तुम्हाला पडतो का? शिवाय पूर्वीच्या लोकांची स्कीन ही स्वच्छ आणि तजेलदार असायची.

त्यांना त्वचेसंबधीत कोणतेच आजार होत नसायचे.तसेच ते कोणत्याही महागड्या वस्तुंचा वापरदेखील करत नसत, तरीही त्यांचा चेहार इतका फ्रेश का वाटायचा? पडला ना प्रश्न याची थोडक्यात माहिती जाणून घेऊ.

आपण रोज अंघोळ करतांना अंग स्वच्छ करतांना साबणाचा वापर करतो. साधं फ्रेश व्हायचं असेल तरी आपण साबणाचा वापर करतो. मात्र पूर्वी साबणाची सुविधा नव्हती, तेव्हा लोक पाण्याचाच वापर करायचे. पाण्यानेच पूर्वी शरीर स्वच्छ केलं जायचं.

पूर्वी प्रत्येक घरात स्नानगृह नसायची. तेव्हा लोक नदी , तलाव, विहीर यांसारख्या ठिकाणी जाऊन अंघोळ करायचे. त्यात पूर्वी सिंधू संस्कृतीमध्ये सार्वजनिक स्नानगृह होती. त्यानंतर प्रत्येकाच्या घरातच त्यांनी स्नानगृहांची सोय केली. तेव्हा काही काळाने स्नानगृह तोडण्यात आली.मात्र संशोधकांनी नुकताच एका जुन्या स्नानगृहाचा शोध लावला.

Health care
Railway Recruitment: भारतीय रेल्वेत नोकरीचं स्वप्न होणार पूर्ण! निघाली मोठी भरती; एका क्लिकवर जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया

पुर्वी अंघोळीसाठी स्नानगृह असायची. तिथे राहत असलेले सिंधू लोक त्याचा वापर करायचे.सध्याच्या भारत,पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या भागात खूप वर्षांपूर्वी ही संस्कृती राहत होती. त्या काळातल्या लोकांनी 'मोहेंजोदाडो' या भागात अत्यंत सुंदर आणि स्वच्छ स्नानगृह बांधले होते. हे स्नानगृह आताच्या स्टीम बाथिंगचे जुने उदाहरण आहे.

मात्र शरीराच्या स्वच्छतेसाठी फक्त वाफेचे पाणी पुरेसे नसते. त्याचसोबत पुर्वी साबण नसताना निसर्गाच्या सानिध्यात ज्या गोष्टी दिसायच्या त्याचा वापर लोक करायचे असे संशोधकांनी सांगितले आहे.

Health care
SBI Bank Job: सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, मिळणार भरघोस पगार; कुठे आणि कसा कराल अर्ज? जाणून घ्या

साबणात ग्रीस-तेलाचा समावेश असतो जो पाण्याला आकर्षित करतो. त्यामुळे शरीरावर जी घाण बसते ती साबणाच्या वापराने बाहेर पडते. हीच पद्धत नैसर्गिक वस्तूंच्या साहाय्याने केली जायची. त्यावेळेस अंघोळीसाठी रानातल्या वनस्पती, प्राणीजन्य घटक, तेल, वाळू किंवा लाकडी भुसा या सर्व घटकांचा समावेश लोक अंघोळीसाठी करत. पण साबण हा विरघळणारा पदार्थ आहे.त्यामुळे संशोधकांना त्याच माप मिळणं कठीण आहे.हे संशोधन मोहेंजोदाडो येथल्या स्नानगृहामुळे शक्य झाले.

Edited By : Sakshi Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com