

व्हिटॅमिन B12 कमतरता रिपोर्ट नॉर्मल असूनही गंभीर ठरू शकते.
सुरुवातीची लक्षणे साधी असल्याने कमतरता लपून राहते.
नर्व्ह डॅमेज, डिप्रेशन आणि स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका.
आपण नियमित आहार घेतो, कधीमधी मल्टीव्हिटॅमिन घेतो आणि तब्येत ठीक वाटते. अशावेळी सगळ्यांना वाटतं शरीराला आवश्यक असणारे सगळे व्हिटॅमिन आपल्याला मिळतायेत. पण गेल्या काही वर्षांत सतत थकवा जाणवणे, हात सुन्न होणे, मेंदू कमी काम करणे, गोष्टी लक्षात न राहणे आणि सांधे दुखी अशा तक्रारींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अशाच लक्षणांमुळे एका व्यक्तीने केलेल्या साध्या रक्ततपासणीत त्याला धक्कादायक माहिती मिळाली सर्व रिपोर्ट योग्य असूनही त्याच्या शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता होती.
रिपोर्ट्समधील सर्वात आश्चर्ययाची बाब म्हणजे त्याचे B12 लेव्हल्स नॉर्मल रेंजमध्ये होते. यानंतर लक्षात आलं की, व्हिटॅमिन B12 ची कमतरता अनेकदा लपून बसते. रिपोर्ट नॉर्मल असला तरी शरीरातले व्हिटॅमिन B12 कमी असू शकतं आणि त्याचे गंभीर परिणाम शरीरावर दिसू लागतात.
व्हिटॅमिन B12 शरीरातील रेड ब्लड सेल्स वाढवतात. त्याने DNA तयार होतात आणि नर्व्हस सिस्टिमच्या कार्यासाठी खूप आवश्यक आहे. मात्र त्याची कमतरता सुरुवातीला कधीच स्पष्टपणे दिसून येत नाही. म्हणूनच रेंजमध्ये आहे या समजुतीमुळे अनेक लोक गंभीर आजारांपर्यंत पोहोचतात. नॉर्मल रेंजमध्ये असलेल्या लोकांनाही संज्ञानात्मक कमतरता आणि नर्व्ह संबंधी समस्या आढळतात.
अमेरिकेतील मासाच्युसेट्स जनरल हॉस्पिटलच्या एका केसमध्ये ६२ वर्षाचे व्यक्ती दोन महिन्यांपासून हातापायांना झिणझिण्या, चालण्यात त्रास, श्वास घेण्यास अडचण आणि पिवळसरपणा अशा लक्षणांनी त्रस्त होता. तपासणीमध्ये त्याला व्हिटॅमिन B12 कमतरता असल्याचं आढळलं. वेळेवर उपचार न मिळाल्यास अशा रुग्णांमध्ये कायमस्वरूपी नर्व्ह डॅमेज, डिप्रेशन, पॅरानॉइया आणि डिमेन्शिया होण्याचा धोका असतो.
मुळात B12 ची कमतरता वृद्धांमध्ये जास्त दिसते, पण आजकाल तरुणांमध्येही ती झपाट्याने वाढतेय. शाकाहारी आणि व्हेगन आहार घेणारे, वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती, क्रोन्स सिलिअकसारख्या पचनासंबंधी आजारांनी ग्रस्त लोक आणि दीर्घकाळ अॅसिडिटीची औषधे घेणारे रुग्ण यांना कमतरतेचा धोका जास्त असतो. वयानुसार पोटातील ऍसिड कमी होत जाते आणि त्यामुळे B12 चे शोषण कमी होते.
या कमतरतेची लक्षणेही सुरुवातीला फार सामान्य असतात हात-पाय सुन्न होणे, चालण्यात अडथळे, असह्य थकवा, कमजोरी, जीभ सूजणे, अॅनिमिया, एकाग्रतेचा अभाव, स्मरणशक्ती कमी होणे व मेंदूवर परिणाम करणारी इतर लक्षणे. ही लक्षणे इतर अनेक आजारांशी मिळतीजुळती असल्याने B12 ची कमतरता लक्षातच येत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.