Sakshi Sunil Jadhav
बटाटे प्रत्येकाला रोजच्या आहारात लागतात. कोणत्याही भाज्यांमध्ये बटाटा घातला की, लहान मुलं अगदी आवडीने खात असतात. पुढे आपण हेच बटाटे महिनाभर व्यवस्थित कसे ठेवायचे? याबद्दल जाणून घेणार आहोत.
बटाटे नेहमी १० ते १२ सेलियस तापमानात ठेवा. उष्ण जागी ठेवल्याने ते लगेच खराब होतात.
बटाट्यांवर प्रकाश पडल्यास ते हिरवे पडतात आणि विषारी घटक तयार होऊ शकतात. नेहमी अंधाऱ्या जागेत ठेवा.
बटाटे हवेशीर पिशवीत किंवा टोपलीत ठेवा. प्लास्टिकमध्ये ठेवले तर ओलावा वाढतो आणि ते सडतात.
कांदा आणि बटाटा एकत्र ठेवल्यास दोन्ही लवकर खराब होतात. त्यांची साठवण वेगवेगळी करा.
बटाटे धुवून ठेवले तर त्यातील ओलावा खराब होण्याची प्रक्रिया वाढवतो. त्यामुळे ते साठवून ठेवू नका. वापरण्यापूर्वीच धुवा.
एका बटाट्याला अंकुर फुटला तर जवळचे बटाटेही पटकन खराब होतात. ते लगेचच काढून वेगळे ठेवा.
कागदी पिशवी बटाट्यांना योग्य वायुप्रवाह देते आणि त्यांच्या आयुष्यात वाढ होते. किंवा बटाटे मोकळ्या जागी कागदावर ठेवा.
बटाटे साठवले असतील तर आठवड्यातून एकदा तपासा. सडलेले किंवा मऊ बटाटे लगेच काढून टाका.