Sakshi Sunil Jadhav
तांदळाऐवजी जर तुम्ही बाजरीचा वापर करून इडली बनवली, तर ती केवळ स्वादिष्ट नव्हे तर पूर्णपणे ग्लूटेन-फ्री, फायबरयुक्त आणि हेल्दी पर्याय ठरते. चला रेसिपी जाणून घेऊयात.
बाजरीमध्ये भरपूर फायबर, मॅग्नेशियम, आयर्न, प्रोटीन असते. त्यामुळे ही इडली ग्लूटेन-फ्री, डायबिटीस-फ्रेंडली आणि पचायला हलकी मानली जाते.
१ कप बाजरी, दीड कप उडीद डाळ, 1 चमचा मेथी दाणे, मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी. ही सर्व साहित्य घरात सहज उपलब्ध असतात.
बाजरी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्या. धान्यातील धूळ किंवा कण काढण्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा आहे.
बाजरी आणि उडीद डाळ वेगवेगळी 5 ते 6 तास भिजवून ठेवा. मेथी दाणे उडीद डाळीसोबत भिजवावेत.
भिजलेली बाजरी हलक्या पाण्यात दळून घ्या. उडीद डाळ मात्र थोडी फुलवून दळावी. दोन्ही मिश्रण एकत्र करून लोई सारखे बॅटर तयार करा.
बॅटर 7 ते 8 तास उबदार जागी ठेवून फुलू द्या. हे fermentation इडलीला softness आणि चव देते.
इडली प्लेट हलकीशी तेलाने ग्रीस करा. यामुळे इडली चिकटत नाही आणि सहज निघते.
बॅटर प्लेटमध्ये घालून 10 ते 12 मिनिटे स्टीम करा. झाकण उघडण्याआधी 3 मिनिटे थांबल्यास इडली नीट बसते. ताजी गरम इडली नारळाची चटणी, सुक्या चटणी किंवा सांबारसोबत सर्व्ह करा.