Sakshi Sunil Jadhav
आजकाल ३० वर्षांतच केस पांढरे दिसायला सुरुवात झाली आहे. या मागचे कारण म्हणजे, पोषणाची कमतरता, केमिकलयुक्त शॅम्पू-तेलाचा वापर यांसारखी अनेक कारणे जबाबदार आहेत. अशा वेळी नैसर्गिक उपाय सर्वात सुरक्षित आणि प्रभावी ठरतात.
कडीपत्ता, आवळा पावडर आणि नारळ तेल एकत्र करून गरम करा. थंड झाल्यावर स्कॅल्पवर लावल्यास केसांची चमक वाढते आणि पांढरेपणा कमी होऊ शकतो.
आवळा पावडर आणि नारळाचे तेल समान प्रमाणात उकळून तयार केलेले मिश्रण केसांना नैसर्गिक काळेपणा देते. आठवड्यातून दोनदा वापर योग्य ठरतात.
उकळलेल्या कॉफीमध्ये मेहंदी पावडर मिसळून पेस्ट तयार करा. हा पॅक केवळ पांढरे केस झाकत नाही तर केसांना सुंदर नैसर्गिक कॉपर-काळा रंग देतो.
मेहेंदी आणि कॉफीचा पॅक केसांना मऊ, घनदाट आणि चमकदार बनवतो. हे केमिकल डाईपेक्षा सुरक्षित आहे.
कांद्याच्या रसात एक चमचा मध मिसळून स्कॅल्पवर लावल्यास मेलेनिनचे उत्पादन वाढतं आणि केस पुन्हा काळे होण्यास मदत होते.
कडीपत्ता दहीत मिसळून पेस्ट करा. हा हेअर पॅक मुळांना पोषण देतो आणि केस नैसर्गिकरित्या काळे व निरोगी होण्यास मदत करतो.
चुकीचा आहार, झोपेची कमतरता, स्ट्रेस, प्रदूषण, व्हिटॅमिन B12 ची कमी, आणि केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर यामुळे केस अकाली पांढरे होतात.