Sakshi Sunil Jadhav
बाथरूममध्ये ठेवलेला साबण दोन दिवसात वितळून संपतो? याचं कारण म्हणजे पाण्याचा जास्त वापर, ओलसर वातावरण आणि चुकीचे साबणाचे डबे यामुळे असा त्रास सर्वांनाच जाणवतो. अनेक महिला साबण जास्त दिवस टिकवण्यासाठी उपाय शोधतात, पण बहुतेक वेळा हे उपाय काम करत नाहीत.
छिद्रे असलेल्या किंवा जाळीदार तळाच्या साबणाच्या डिशमध्ये पाणी साचत नाही, त्यामुळे साबण जास्त काळ कोरडा राहतो.
साबण वापरल्यानंतर पाण्यात ठेवला तर तो लगेच मऊ होतो आणि वितळू लागतो.
आंघोळीनंतर साबण नळ किंवा शॉवरजवळ ठेऊ नका. कोरड्या भागात ठेवला तर त्याचे आयुष्य वाढते.
ओलावा जास्त असेल तर साबण बुरशी लागल्यासारखा होतो. त्यामुळे बाथरूम हवेशीर ठेवणे आवश्यक.
मोठा साबण छोटे तुकडे करून वापरल्यास उरलेला साबण कोरडा राहतो आणि लवकर संपत नाही.
प्रत्येक वापरानंतर साबण हवा येईल अशा ठिकाणी ठेवा; यामुळे तो लगेच घट्ट होतो.
दोन साबण आळीपाळीने वापरल्यास एक सुकत असताना दुसरा वापरता येतो आणि दोन्ही जास्त काळ टिकतात.
लूफा आणि स्क्रबर ओलावा धरून ठेवतात; साबण त्यावर ठेवल्यास तो लवकर वितळतो.