Heart Attack: हार्ट अटॅकची सर्वात कॉमन लक्षणं कोणती? रुग्णालयात जाण्यापूर्वी करा 'ही' कामं; डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकची लक्षणं ओळखून वेळीच मदत मिळवणं जीव वाचवण्यासाठी महत्त्वाचं आहे. छातीत दुखणं, श्वास लागणं, थंड घाम आणि चक्कर आल्यास काय करावं, रुग्णाला अॅस्पिरिन देताना कोणती काळजी घ्यावी आणि CPR कधी दिला पाहिजे ते पाहूयात.
Heart Attack
Heart Attacksaam tv
Published On: 

हार्ट अटॅकची समस्या दिवसेंदिवस गंभीर होताना दिसतेय. मुळात आता हा आजार केवळ वयस्कर व्यक्तींनाच नाही तर तरुणांनाही याचा त्रास होत असल्याचं पाहायला मिळतंय. काही प्रकरणांमध्ये लहान मुलांचाही हार्ट अटॅकमुळे मृत्यू होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत हार्ट अटॅकची लक्षणं ओळखणं आणि वेळीच उपचार मिळवून देणं खूप महत्त्वाचं आहे.

दिलेल्या माहितीनुसार, भारतात दरवर्षी हार्ट अटॅकमुळे २८.६ लाख लोकांचा मृत्यू होतो. हार्ट अटॅक आल्यास रुग्णालयात जाण्यापूर्वी काय करावं याबाबत इंडिया टीव्हीच्या वेबसाईटला नोएडातील फोर्टिस हॉस्पिटलमधील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हर्निश सिंह भाटिया यांनी महत्त्वाची माहिती दिलीये.

Heart Attack
Heart Attack Warning Signs: हार्ट अटॅक येण्याआधी शरीर देतं हे 3 संकेत; थकवा समजून दुर्लक्ष करण्याची चूक करू नका

हार्ट अटॅकची लक्षणं कोणती?

हार्ट अटॅक म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अचानक अडथळा निर्माण होणं. यामुळे हृदयाच्या स्नायूंना नुकसान होऊ शकतं. अशा वेळी लवकर उपचार मिळणं महत्त्वाचं असतं. हे उपचार जर वेळेवर मिळाले तर रूग्णाचा जीव वाचू शकतो.

हार्ट अटॅकचं सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखणं किंवा दडपण जाणवणं. छातीत जडपणा, जळजळ किंवा छाती घट्ट झाल्यासारखं वाटू शकतं. हा त्रास काही मिनिटांपेक्षा जास्त वेळ राहू शकतो किंवा कमी होऊन पुन्हा सुरू होऊ शकतो. वेदना डाव्या हातात, दोन्ही हातांत, खांद्यात, पाठीत, मानेत किंवा जबड्यातही जाणवू शकतात.

याशिवाय श्वास लागणं, थंड घाम येणं, मळमळ, उलटी, चक्कर येणं, खूप अशक्तपणा आणि अस्वस्थ वाटणं हीदेखील हार्ट अटॅकची लक्षणं आहेत. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये काही वेळा छातीत दुखण्याऐवजी श्वास लागणं, अशक्तपणा, अपचन किंवा अचानक जास्त थकवा जाणवू शकतो.

हार्ट अटॅकचा संशय आल्यास काय करावं?

तातडीने रुग्णवाहिका बोलवा

हार्ट अटॅकचा संशय आल्यास वेळ वाया घालवू नका. रुग्णाला तातडीने वैद्यकीय मदत मिळवून द्या.

रुग्णाला आराम करू द्या

रुग्णाला बसवा किंवा आरामदायी स्थितीत ठेवा. त्याला स्वतः गाडी चालवून रुग्णालयात जाण्यास सांगू नका.

अॅस्पिरिन देताना काळजी घ्या

रुग्ण शुद्धीत असेल आणि त्याला औषध गिळता येत असेल तर अॅस्पिरिनची अॅलर्जी नसल्यास रक्तस्राव होत नसल्यास आणि डॉक्टरांनी हे औषध घेण्यास मनाई केलेली नसल्यास १५० ते ३२५ मिलीग्रॅम अॅस्पिरिन चावून घेणं मदत करू शकतं.

Heart Attack
Heart attack: हार्ट अटॅक येण्याआधी शरीर देतं हे ५ संकेत; ॲसिडिटी आणि थकवा समजून दुर्लक्ष केल्यास पडेल महागात

गॅस किंवा अॅसिडिटी समजून दुर्लक्ष करू नका

छातीत दुखणं, घाम येणं किंवा श्वास लागणं यांसारखी लक्षणं दिसल्यास हा केवळ गॅसचा त्रास आहे, असं समजू नका. तातडीने वैद्यकीय मदत घ्या.

रुग्ण बेशुद्ध झाल्यास CPR करा

रुग्ण बेशुद्ध झाला आणि सामान्यपणे श्वास घेत नसेल तर तातडीने आपत्कालीन मदत बोलवा आणि CPR देण्यास सुरुवात करा. उपलब्ध असल्यास AED या हृदयाला विजेचा धक्का देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाची मदत घ्या.

Heart Attack
Blood sugar control: डायबिटीजमध्ये 3 छोट्या चुका पडू शकतात महागात; ब्लड शुगर वाढू नये यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com